Home » Blog » Athavale statement : महायुतीत मी समाधानी, कार्यकर्ते नाहीत : आठवले

Athavale statement : महायुतीत मी समाधानी, कार्यकर्ते नाहीत : आठवले

by प्रतिनिधी
0 comments
Athavale statement

कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील महायुतीच्या विजयात रिपब्लिकन पक्ष आणि कार्यकर्त्यांचा मोठा वाटा आहे. पण महायुतीत फक्त तीन पक्षांचे नाव घेतात. पण माझ्या पक्षाचे नाव घेत नाहीत. महायुतीत मी समाधानी आहेत पण कार्यकर्ते नाहीत, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बोलून दाखवली. (Athavale statement)

केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, भाजपसोबत रिपब्लिकन पक्ष सर्व ठिकाणी सोबत आहोत.  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत त्यांनी जागा दिल्या पाहिजेत. जिल्हा नियोजन मंडळातही आम्हाला हिस्सा हवा आहे. त्यासंदर्भात मी सर्व पालकमंत्र्यासोबत बोलणार आहेत. महायुतीत मी समाधानी आहे पण कार्यकर्ते नाहीत, जिल्हा पातळीवर महामंडळाच्या माध्यमातून संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. (Athavale statement)

बाळासाहेब आंबेडकर आणि आम्ही एकत्र आल्याशिवाय रिपब्लिकन ऐक्य होणार नाही. दलित पँथर स्थापन व्हावे, अशी अनेकांची इच्छा आहे असे सांगून रामदास आठवले म्हणाले. रिपब्लिकन ऐक्य साठी पँथर बरखास्त करावी लागली. आता लवकरच पँथर साठी महाबळेश्वर इथं बैठक होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (Athavale statement)

गुजरात अहमदाबाद येथे झालेल्या अपघाताबद्दल ते म्हणाले, अहमदाबादला जो अपघात झाला हा अपघात खूप मोठा आहे. ही जगातील पहिलीच घटना असण्याची शक्यता आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपांनी यांचा मृत्यू ही  दुःखदायक घटना आहे. या अपघातात २७४ जणांचा मृत्यू झाला. या अपघातातील जखमींनाही मदत मिळाली पाहिजे. सर्वात म्हणजे  विमान उड्डाणाला विलंब झाले तरी चालेल पण विमानाची पूर्ण तपासणी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. (Athavale statement)

You may also like

error: Content is protected !!