Home » Blog » Clashes between BJP factions : भाजपाच्या दोन गटांत हाणामारी

Clashes between BJP factions : भाजपाच्या दोन गटांत हाणामारी

by प्रतिनिधी
0 comments
Clashes between BJP factions

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी शड्डू ठोकलेल्या भाजपाच्या कांदिवली पूर्व येथील दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. जानूवाडा येथे हा प्रकार घडला. स्थानिक पदाधिकारी देवांग दवे आणि भाजपा आ. प्रविण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांच्या समर्थकांनी मुंबई भाजपाचे अध्यक्ष व उपगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या समोरच हा राडा केला. पोलिसांनी धाव घेत हस्तक्षेप केल्याने पुढचा अनर्थ टळला. (Clashes between BJP factions)

कांदिवली पूर्वेत जानुपाडा परिसरात मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार शनिवारी (१४ जून) सकाळी भेट देण्यासाठी आले होते. यावेळी भाजपा पदाधिकारी देवांग दवे आणि माजी नगरसेवक प्रकाश दरेकर यांचे समर्थक एकमेकांना भिडले. शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धाव घेतली. पोलिसही त्यावेळी तिथे उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा तुफान राडा झाला.

यानंतर समता नगर पोलिसांनी काही भाजपा पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले. यावेळी कुणी विरुद्ध तक्रार दाखल करू नका अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली. यावेळी भाजप पदाधिकारी असलेले देवांग दवे हे आक्रमक झाले होते. जो काय गोंधळ झाला त्याची दखल पक्षाचे वरिष्ठ नेते नक्की घेतील. शिवाय संबंधितावंर कारवाई करतील असे आश्वासन मात्र भाजप कार्यकर्त्यांना यावेळी देण्यात आले. (Clashes between BJP factions)

 मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इच्छुक असणार आहेत. त्यामुळे आतापासूनच मोर्च बांधणी केली जाते. शिवाय स्थानिक पातळीवर शक्तिप्रदर्शनही केले जात आहे. वर्चस्वासाठीच हा राडा झाल्याचे सांगण्यात आले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00