Home » Blog » MP Kanimozhi: विविधतेत एकता ही भारताची राष्ट्रीय भाषा : कनिमोळी

MP Kanimozhi: विविधतेत एकता ही भारताची राष्ट्रीय भाषा : कनिमोळी

by प्रतिनिधी
0 comments
MP Kanimozhi

नवी दिल्ली : ‘‘विविधतेत एकता हीच भारताची राष्ट्रीय भाषा आहे, ’’ असे उत्तर सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या द्रमुक खासदार कनिमोळी यांनी स्पेनमध्ये बोलताना दिले. भारताची राष्ट्रभाषा कोणती असे त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी त्या काही क्षण गोंधळल्या, मात्र त्यांनी लगेचच दिलेल्या चपखल उत्तराने उपस्थित असलेल्या भारतीय समुदायाने टाळ्यांचा गजर केला. (MP Kanimozhi)

कनिमोळी यांचा या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

ऑपरेशन सिंदूरविषयी भारताची भूमिका जागतिक पटलावर समजून सांगण्यासाठी नेमलेल्या एका शिष्टमंडळाचे नेतृत्व कनिमोळी करीत आहेत. या शिष्टमंडळाने स्पेनमधील भारतीय समुदायाशी संवाद साधला. त्यावेळी कनिमोळी यांना ‘‘भारताची राष्ट्रीय भाषा कोणती,’’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी प्रसंगावधान राखत त्यांनी ‘विविधतेत एकता हीच भारताची राष्ट्रीय भाषा आहे,’ असे उत्तर दिले. ‘‘हाच संदेश जगासमोर घेऊन आम्ही जात आहोत, तीच आजची ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे, ’’ असे त्या म्हणाल्या. (MP Kanimozhi)

द्रमुकने त्रिभाषा धोरणावर व्यापक विरोध केला आहे. तसेच त्रिभाषा सूत्र लादण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाला सातत्याने असहमती दर्शवली आहे. त्यांच्या पक्षाचा हा इतिहास पाहता कनिमोळी यांनी दिलेल्या उत्तराने उपस्थित भारतीय भारावून गेल्याचे दिसून आले.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये प्रस्तावित केलेल्या त्रिभाषिक सूत्रावर केंद्र सरकारला विरोध करण्यात द्रमुकने आघाडीची भूमिका घेतली आहे. (MP Kanimozhi) कनिमोळी यांनी स्वतः केंद्र सरकारवर त्रिभाषा धोरण आणि राष्ट्रीय शिक्षण परिषदेला विरोध केल्यामुळे ‘‘तामिळनाडूचा निधी रोखून ठेवल्याचा’’ आणि ‘‘मुलांचे भविष्य उद्ध्वस्त केल्याचा’’ आरोप केला आहे. द्रमुकने संसदेबाहेर आणि तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरुद्ध निदर्शने केली होती.

हेही वाचा :
भूकंप झाला आणि दोनशे कैदी पळाले
राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00