Home » Blog » Shirsat : मंत्र्यांच्या मुलांकडून ६४ कोटीचे हॉटेल खरेदी

Shirsat : मंत्र्यांच्या मुलांकडून ६४ कोटीचे हॉटेल खरेदी

by प्रतिनिधी
0 comments
Shirsat

संभाजीनगर : प्रतिनिधी : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत यांनी ६४ कोटी रुपयांचे हॉटेल खरेदी केले आहे. मंत्र्याच्या दबावामुळे महसूल विभागाने  २०० कोटींचे अलिशान हॉटेल  मंत्र्याचा मुलाला  ६४ कोटी रुपयांना विक्री केल्याने सरकारचा कोट्यवधीचा महसूल बुडाला आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. (Shirsat)

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक मार्गावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वेदांत हॉटेल आहे. वेदांत हॉटेल आणि जवळच्या भूखंडाचा शासनाने ऑनलाइन लिलाव केला. वेदांत हॉटेलसाठी मेसर्स सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट अन्ड सप्लाय कंपनीने हॉटेल इमारत व जलतरण तलावासाठी ४७ कोटी ५६ हजार ७४९ रुपयांमध्ये सर्वोच्च बोली लावली होती. तसेच लॉनसाठी १७ कोटी ८२ लाख ६६ हजार रुपयांची बोलीही लावली. लिलावामध्ये सिद्धांत शिरसाट यांनी ६४ कोटी ८२ लाख रुपयांना बोली लावलयाने त्यांच्या मालकीचे हॉटेल झाले. (Shirsat)

धनदा कॉर्पेरशन ही शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपनीने शेकडो ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने या मालमत्तेचा लिलाव झाला. यापूर्वी सहा वेळा या मालमत्त्ची ई लिलावाची प्रक्रिया झाली होती. पण लिलाव प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने सातव्यांदा ई लिलाव प्रक्रिया केली. त्यामध्ये मंत्री संजय शिरसाठ यांच्या मुलगा सिद्ध्दांत यांची सर्वोच्च बोली ठरल्याने त्यांनी ६४ कोटी रुपये किंमतीचे हॉटेल खरेदी केले. (Shirsat)

खासदार संजय राऊत यांची टीका

महागडे हॉटेल खरेदीसाठी संजय शिरसाटांच्या मुलांकडे पैसा कुठून आला? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. इतकी रक्कम कुठल्या टेंडरिंगमधून आली की शिरसाट यांना मिळालेल्या ५० खोक्यातील हा पैसा आहे अशी टीका राऊत यांनी केली. शिरसाटांना इतर आमदारांपेक्षा जास्त पैसे मिळाले का?  असा सवालही त्यांनी केला.  

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00