Home » Blog » US court  : अमेरिकन न्यायालयाकडून ‘टेरिफ’ बेकायदेशीर

US court  : अमेरिकन न्यायालयाकडून ‘टेरिफ’ बेकायदेशीर

by प्रतिनिधी
0 comments
US court

वॉशिंग्टन : अमेरिकेतील मॅनहॅटन येथील संघीय न्यायालयाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने लागू केलेले टेरीफवर बंदी आणली आहे. टेरिफला त्यांनी बेकायदेशीर ठरवले आहे. टेरिफ वर निर्णय घेण्याचा अधिकार फक्त संसदेला म्हणजेच काँग्रेसला आहे. राष्ट्राध्यक्षांना नाही असे निकालात म्हटले आहे. (US court decision)

न्यायालयाने टेरिफवर बंदी घालताना निकालात असे म्हटले आहे की, राष्ट्रपतींनी अधिकाराचा गैरवापर केला आहे आणि अमेरिकन संविधानाविरुद्ध पावले उचलली आहे. ट्रम्प प्रशासनाने राष्ट्रपतींनी घेतलेल्या निर्णयाचे समर्थक करण्याचा प्रयत्न केला आणि टॅरिफ कायम ठेवण्याचा आग्रह केला आहे.

ट्रम्प प्रशासनाने लागू केलेल्या जागतिक आयात शुल्कांना मॅनहॅटन कोर्टाने स्थगिती दिली असून डेमोक्रॅटिक राज्य आणि लघू उद्योग गटांनी या दरांविरुद्ध खटला दाखल केला होता. (US court decision)

शेअर बाजारात सकारात्मक संदेश

अमेरिकन न्यायालयाच्या निर्णयानंतर जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळू लागले आहेत. अशियाई आणि भारतीय शेअरबाजारात या निर्णयानंतर तेजी दिसून आली आहे. जागतिक बाजारात डाऊ फ्युचर्समध्ये अंदाजे ५०० अंकांनी वाढ झाली आहे. अमेरिन डॉलर निर्देशांक पुन्हा १०० च्यावर पोहोचला आहे. (US court decision)

भारतीय शेअरबाजारात चांगली सुरुवात

शेअर बाजार वाढीसह गुरुवारी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात झ्घली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २७९ अंकांनी वाढून ८१ हजार ५९१ वर पोचला आहे. प्री ओपनिंगला ४७९ अंकांनी आघाडी घेतली होती. इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा स्टील, झोमॅटो, सन फार्मा, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स मध्ये वाढ झाली आहे. (US court decision)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00