Home » Blog » Gogoi clarified: होय, मी पाकिस्तानला गेलो होतो : गोगोई

Gogoi clarified: होय, मी पाकिस्तानला गेलो होतो : गोगोई

by प्रतिनिधी
0 comments
Gogoi clarified

दिल्ली : काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी दशकापूर्वी पाकिस्तानला भेट दिल्याची जाहीर कबुली दिली. मात्र ही भेट त्यांच्या पत्नीच्या व्यावसायिक कामाशी संबंधित होती. गोगोई यांच्या कबुलीनंतर आसाममध्ये राजकीय वादळ उठले आहे. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Gogoi clarified)

गोगोई यांनी ही भेट २०१३ मध्ये दिली होती आणि ती त्यांच्या पत्नीच्या व्यावसायिक कामाशी संबंधित होती, असे स्पष्ट केले. तर मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानशी खोलवरचे संबंध असल्याचा आरोप केला आहे. १० सप्टेंबर रोजी विशेष तपास पथक (एसआयटी) कडून स्फोटक निष्कर्ष उघड करणार असल्याचे सरमा यांनी म्हटले आहे.

दिल्लीतील एआयसीसी कार्यालयात बोलताना गोगोई म्हणाले, ‘‘मी ११-१२ वर्षांपूर्वी २०१३ मध्ये माझ्या पत्नीसह पाकिस्तानला गेलो होतो. त्यावर आधारित आसामचे मुख्यमंत्री १० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा ‘सी’ ग्रेड चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत.’’ (Gogoi clarified)

माझी पत्नी हवामान बदलावर काम करते. एका प्रकल्पावर सार्वजनिक धोरण विश्लेषक म्हणून काम करताना तिच्यावर असलेल्या व्यावसायिक जबाबदाऱ्यांमुळे ते २०११ मध्ये पाकिस्तानात घेऊन गेले, असे गोगोई यांनी स्पष्ट केले.

त्यावर मुख्यमंत्री सरमा यांनी त्यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

गोगोई यांनी हे आरोप फेटाळून लावले. सरमा यांनी आरोप करण्याची वेळ आणि हेतूंवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

ते म्हणाले, ‘‘आम्ही आसामच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारू इच्छितो, जर हा आरोप खरा असेल आणि आपण काही चुकीचे केले असेल तर गेल्या ११-१२ वर्षांपासून कोणाचे सरकार सत्तेत आहे.? केंद्रीय तपास यंत्रणा काय करत आहे,? निवडणुका जवळ येत आहेत. त्यामुळे राजकीय डावपेचाचा भाग म्हणून हे बेछूट आरोप केले जात आहेत, असे गोगोई म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचे आरोप काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर पसरले आहेत, त्यांनी तडजोड केलेल्या व्यक्तीला सार्वजनिक जीवनात प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. (Gogoi clarified) गोगोई यांनी त्यांच्या सार्वजनिक क्षेत्रातील कामाच्या पारदर्शकतेवर जोर दिला आहे, दुसरीकडे आसाम सरकार पारदर्शक आहे आणि जनतेप्रति आपली वचनबद्धता सरकार कायम ठेवेल. एसआयटीचे निष्कर्ष जनतेसमोर पूर्णपणे उघड केले जातील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00