Home » Blog » Ajit Pawar get angry : हगवणे प्रकरणात मला का दोषी धरता?

Ajit Pawar get angry : हगवणे प्रकरणात मला का दोषी धरता?

अजित पवार कोल्हापूरात संतापले

by प्रतिनिधी
0 comments
Ajit Pawar get angry

कोल्हापूर : प्रतिनिधी : ‘मी कोणाच्या लग्नाला जाणार नाही’ असे अजित पवारांनी म्हटल्यांवर सभेतील हास्यविनोदाच्या व्हिडोओबद्दल प्रश्न विचारला असता अजित पवार कोल्हापूर दौऱ्यात चांगलेच भडकले. उप मुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांनी वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणांशी संबधित विचारलेल्या प्रश्नांवर पवारांनी स्पष्टीकरण दिले. (Ajit Pawar get angry)

मालेगावमधील एका सभेत अजित पवारांनी यांनी ‘मी आता कोणत्याच लग्नाला जाणार नाही’ असे म्हणल्यावर सभेत हास्य विनोद रंगला होता. पण ही गंभीर बाब असताना अशा प्रकारच्या व्हिडिओवर अजित पवार यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणले की “मी भाषणात म्हणालो होते की माध्यमांतील लोकं मी लग्नाला गेल्याचे फोटो दाखवत होते. मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला. त्यानंतर काही वेगळे घडले यात माझा काय दोष? असा सवाल त्यावेळी मी केला. मी तिथे लोकांना असे म्टले की जर माझ्यावर असे आरोप करण्यात येत असतील तर मी कोणाच्या लग्नाला जाणार नाही. असे म्हटल्यांवर समोरच् लोक असली, त्यात माझा काय दोष? जर माझा दोष नाही तर मला का दोषी ठरवता?. असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला. (Ajit Pawar get angry)

उप मुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कस्पटे कुटुंबाला विचारले का अजित पवार कोणत्या विचाराचे आहेत? वैष्णवीचे वडील माझ्याशी बोलले आहेत. तुम्हाला काय अजित पवारांशिवाय उद्योग नाही. माझा कुठेही संबध नसताना माझे नाव जोडले जाते. मी अशाप्रकारचे कृत्य करायला सांगितले होते का? असा सवाल करत त्यांनी माध्यमांबाबत संताप व्यक्त केला. ते म्हणाले, दुर्देवाने विविध माध्यमांमध्ये काही जणांनी माझ्या नावाची बदनामी केली आहे. माझा त्यात दुरान्वयेही संबध नाही. पहिल्या दिवसापासून कडक कारवाई करण्याचे आदेश मी दिलेले आहेत. अटक झालेल्या दोघांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Ajit Pawar get angry)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00