Home » Blog » Thug Life : ‘ठग लाईफ’चा ऑडिओ लाँच लांबणीवर

Thug Life : ‘ठग लाईफ’चा ऑडिओ लाँच लांबणीवर

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

0 comments
Thug Life

मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कमल हासन यांच्या आगामी ‘ठग लाईफ’ या चित्रपटाचा ऑडिओ लाँच पुढे ढकलण्यात आला आहे, असे त्यांनी शुक्रवारी सांगितले. (Thug Life)

कमल हसन यांनी,  ‘‘भारत प्रथम, कला वाट पाहू शकते.’’ या शीर्षकाखाली निवेदन जारी केले आहे. यात त्यांनी या काळात संयम आणि चिंतन करण्याचे आवाहन केले आहे.

‘‘आपल्या देशाच्या सीमेवरील घडामोडी आणि सध्याच्या वाढत्या सतर्कतेची स्थिती लक्षात घेता, आम्ही ‘ठग लाईफ’ या चित्रपटाच्या ऑडिओ लाँचचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे,’’ असे कमल यांनी निवेदनात म्हटले आहे. १६ मे रोजी नियोजित ऑडिओ लाँच करण्यात येणार होता. (Thug Life)

‘‘आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले सैनिक अढळ धैर्याने आघाडीवर उभे आहेत. हा उत्सव साजरा करण्याचा नाही तर शांततेचा आणि एकतेचा काळ आहे असे मला वाटते. ऑडिओ लाँचची योग्य वेळी नवीन तारीख जाहीर केली जाईल. यावेळी, आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी जागरूक असलेल्या आपल्या सशस्त्र दलातील शूर पुरुष आणि महिलांबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. नागरिक म्हणून, संयम आणि एकतेने प्रतिसाद देणे हे आपले कर्तव्य आहे,’’ असे निवेदनात पुढे म्हटले आहे.

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. दोन्ही देशांमध्ये राजनैतिक संकट निर्माण झाले. भारत आणि पाकिस्तानमधील या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे. (Thug Life)

‘ठग लाईफ’ हा तमिळ चित्रपटांपैकी एक महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे. ३८ वर्षांनंतर कमल हासन आणि चित्रपट निर्माते मणिरत्नम यांच्या सहकार्याने हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्रिशा, सिलंबरसन, जोजू जॉर्ज, अशोक सेल्वन, नासेर आणि अभिरामी यांच्याही भूमिका आहेत. ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी चित्रपटाचे संगीत दिले आहे. ठग लाईफची निर्मिती राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल, मद्रास टॉकीज आणि रेड जायंट मुव्हीज यांनी संयुक्तपणे केली आहे.

हेही वाचा :
बुद्धांच्या अठराशे ‘रत्न अवशेषां’चा लिलाव रोखला
सोन्यापेक्षा ही धूळ आहे मौल्यवान

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00