Home » Blog » AI Mazu : मंदिरातील देवी बोलू लागली…

AI Mazu : मंदिरातील देवी बोलू लागली…

कोणत्या मंदिरात आहे ही मूर्ती?

by प्रतिनिधी
0 comments
AI Mazu

बीजिंग : मलेशियातील एका ताओवादी मंदिरातील मूर्ती बोलू लागली आहे. ती येणाऱ्या भक्तांशी संवाद साधू लागली आहे. त्यांचे शंका समाधान करू लागली आहे. साक्षात मंदिरातील देव बोलू लागल्याने भक्तही त्याच्याशी संवादी साधण्यासाठी कमालीचे उत्सुक आहेत. (AI Mazu)

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’ने जगाला वेडे बनवले आहे. आता प्रत्येक क्षेत्रांत एआयचा वापर करण्याची चढाओढ लागली आहे. महाकाय उद्योगापासून ते अगदी स्वयंपाक घरापर्यंत एआयचा वापर करून आयुष्य सुखकर करायचा प्रयत्न होताना दिसतो आहे. त्याला अध्यात्म तरी कसे अपवाद असेल. (AI Mazu)

मलेशियातील या मंदिरातही एका एआय कंपनीने अशीच ‘‘एआय माझू मूर्ती’’ बसवली आहे. नुकतेच तिचे अनावरण करण्यात आले

दक्षिण मलेशियातील जोहोर येथे हे तियानहौ मंदिर आहे. या मूर्तीशी संवाद साधतानाचे व्हिडीओ समाजमाध्यमांकवर व्हायरल केले आहेत.

पारंपारिक चिनी पोशाख परिधान केलेल्या एका सुंदर महिलेच्या रूपात या देवतेची मूर्ती तयार केली आहे.

ती जगातील पहिली ‘एआय माझू’ असल्याचा दावा या मंदिराने केला आहे. (AI Mazu)

एआय-चलित ही डिजिटल देवता मलेशियन तंत्रज्ञान कंपनी आयमाझिनने विकसित केली होती. ती माणसाचे एआय क्लोनिंगही देते.

एका प्रात्यक्षिक व्हिडिओमध्ये, कंपनीचे संस्थापक शिन काँग यांनी ‘एआय माझू’ला विचारले की माझे भाग्य अनपेक्षितपणे उजळू शकते का? (मंदारिनमध्ये त्याला ‘पियान कै युन’ म्हणतात.)

त्यावर शांत आणि कोमल आवाजात, एआय माझूने, जर ती घरी राहिली तर तिचे भाग्य अनपेक्षितपणे उजळेल, असे उत्तर दिले.

त्यानंतर एका प्रभावशाली व्यक्तीने रात्री झोप येत नाही, त्यावर तिचा सल्ला मागितला. त्यावर ‘‘माझी पोर’’ असे संबोधत एआय माझूने तिला झोपण्यापूर्वी थोडे गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला. (AI Mazu)

माझूविषयी…

२० एप्रिल रोजी समुद्र देवतेची १,०६५ वी जयंती आहे. या पार्श्वभूमीवर एआय माझूचे प्रकाशन करण्यात आले.

माझूचा जन्म ९६० मध्ये आग्नेय चीनच्या फुजियान प्रांतातील पुतियान येथील मेइझोउ बेटावर लिन मो नावाच्या एका नश्वराच्या रूपात झाला, असे मानले जाते.

फुटलेल्या जहाजातील प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करताना लिनचा मृत्यू झाला. त्यानंतर तो स्वर्गात गेला, अशी आख्यायिका आहे. खलाशांचा एक सर्वशक्तिमान रक्षक म्हणून त्याची पूजा केली जात होती.

मलेशिया, सिंगापूर आणि इंडोनेशियासारख्या आग्नेय आशियाई देशांसह जगभरातील चिनी लोकांमध्ये माझूची पूजा केली जाते.

हेही वाचा :
संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी
सोन्याच्या दरात चार हजारांची घसरण

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00