Home » Blog » Almatti Dam : ‘अलमट्टी’  विरोधात ग्रामसभेत ठराव करा

Almatti Dam : ‘अलमट्टी’  विरोधात ग्रामसभेत ठराव करा

राजू शेट्टींचे आवाहन

by प्रतिनिधी
0 comments
Almatti Dam

जयसिंगपूर : प्रतिनिधी :  कर्नाटक राज्य सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. अलमट्टी धरणाच्या बाधीत लोकांना मोबदला देवून त्यांना स्थलांतरीत करण्यात येत असून याला तीव्र विरोध करण्यासाठी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुरबाधित गावातील ग्रामपंचायतींनी एक मे च्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधातील ठराव करून सदरचे ठराव प्रधानमंत्री कार्यालयास पाठविण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. (Almatti Dam)

         पत्रकात असे म्हटले आहे की,  अलमट्टी धरणाची उंची वाढविल्याने शेती, औद्योगीक व साखर कारखानदारीला सर्वात मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून याबाबत दुर्लक्ष केले जात असून केंद्र सरकारकडे गांभीर्याने पाठपुरावा न केल्याने याचा फटका सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला बसणार आहे. राज्य सरकार जर याबाबत दोन्ही जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार असेल तर सामान्य जनतेने एकत्रित येवून लढा तीव्र करणे गरजेचे आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या पुरक्षेत्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील बाधित गावे अलमट्टी धरणाची उंची वाढविल्यास अनेक गावे स्थलांतरीत करावी लागणार आहेत. (Almatti Dam)

      याकरिता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुरबाधित गावातील सर्व ग्रामपंचातीनी एकत्रित येवून एक मेच्या ग्रामसभेमध्ये अलमट्टी धरणाची उंची वाढविण्या विरोधात ठराव करून सदरचा ठराव प्रधानमंत्री कार्यालय , केंद्रीय जल आयोग , महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयास ठरावाच्या प्रति पाठविण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. केंद्र व राज्य सरकारने या गोष्टीची दखल न घेतल्यास सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला सोबत घेऊन  तीव्र लढा उभारणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. (Almatti Dam)

हेही वाचा :

१५ ऑगस्टपर्यंत सर्व सेवा ऑनलाईन करा

एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा

शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्रज्ञ डॉ. संजय चव्हाण यांना जर्मन पेटंट

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00