Home » Blog » Asaduddin Owaisi : ओवेसींचा पाकिस्तानला इशारा

Asaduddin Owaisi : ओवेसींचा पाकिस्तानला इशारा

परभणीत जाहीर सभा

by प्रतिनिधी
0 comments
Asaduddin Owaisi

परभणी : प्रतिनिधी : ‘‘एकाद्या देशात घुसुन निष्पाप लोकांना मारतील तर तो देश शांत बसणार नाही”, असा इशारा एमआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला दिला आहे. ते महाराष्ट्रातील परभणी येथील एका सभेत बोलत होते.

पाकिस्तान अणुक्षमतेबद्दल वारंवार बढाया मारत असून भारतावर टीका करत आहे. या टीकेचा समाचार घेताना ओवेसी म्हणाले “पाकिस्तान नेहमीच अणुशक्ती असल्याबद्दल बोलत असतो. पण त्यांना लक्षात ठेवण्याची गरज आहे की एकाद्या देशात घुसून निष्पाप लोकांना मारतील तर तो देश शांत बसणार नाही. सरकार कोणाचेही असो. पण आपल्या भूमीवर आपल्या लोकांना मारुन आणि धर्माच्या आधारे त्यांना लक्ष्य  करुन तुम्ही कोणत्या ‘दीन’ बद्दल बोलत आहात? तुम्ही आयसिससारखे वागला आहेत, अशी टीकाही त्यांनी पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यावर बोलताना केली.

ओवेसी यांनी पाकिस्तानची खिल्लीही उडवली. ते म्हणाले “पाकिस्तानात बसून जे लोक बकवास बोलतात त्यांना तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास मागे आहात हे लक्षात ठेवावे. तुम्ही फक्त अर्धा तास मागे नाहीत तर अर्धशतक मागे आहात. तुमच्या देशाचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही ,अशा शब्दात खिल्ली उडविली. ओवेसी यांनी असा दावा केला की पाकिस्तान बऱ्याच काळापासून भारताविरुद्ध दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. आणि लष्करे ए तैयब्बा ही पाकिस्तान सरकारची अवैध संतती आहे.

हेही वाचा :

पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी

भारतात पाच लाखाहून अधिक पाकिस्तानी महिला

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00