Home » Blog » Vaibhav : वैभव सूर्यवंशीला सेहवागचा कडक सल्ला

Vaibhav : वैभव सूर्यवंशीला सेहवागचा कडक सल्ला

खेळाडूचे पाय जमिनीवर हवेत

by प्रतिनिधी
0 comments
Vaibhav

नवी दिल्ली : प्रतिनिधी : आयपीएलमध्ये पदार्पणातच पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून धुवाँधार खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने कडक सल्ला दिला आहे. आत्मसंतुष्टेपासून त्याला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सुरवातीच्या यशामुळे कायमस्वरुपी कामगिरी करण्यासाठी खेळाडूचे पाय सदैव जमिनीवर राहिले पाहिजेत असेही तो म्हणाला. सेहवागने स्पष्ट संदेश दिला आहे की प्रतिभा दार उघडू शकते. परंतु टिकून राहण्यासाठी शक्ती वर्षानुवर्षे निर्माण होते. (Vaibhav)

बिहारमधील वैभव सूर्यवंशीला १.१ कोटी रुपयाला रायस्थान रॉयलने खेरदी केली. सर्वात तरुण खेळाडू असलेल्या वैभव सूर्यवंशीने पहिल्याच सामन्यात आशादायक कामगिरी करताना दोन षटकार खेचले. त्याने दोन सामन्यात १५६.२५ स्ट्राईक रेटने ५० धावा केल्या. (Vaibhav)

क्रिकबिझवर बोलताना सेहवाग म्हणाला, “जर चांगली कामगिरी केली तर तुमचे कौतुक होईल पण कामगिरी चांगली न झाल्यास टीका होईल. कौतुक नम्रपणाने स्वीकारणे आणि टीकेतून शिकला तरच तुम्ही मैदानावर रहाल. मी असे अनेक खेळाडू पाहिले आहेत जे येतात, एक दोन सामन्यांमधून प्रसिद्धी मिळवतात परंतु ते काहीही करत नाहीत. कारण त्यांना वाटते आपण स्टार खेळाडू आहोत”. (Vaibhav)

सेहवाग म्हणाला. वैभवने हेच लक्ष्य ठेवले पाहिजेत. जर त्याला वाटत असेल की त्याने फक्त पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि एक काटी रुपये कमावले म्हणून तो यशस्वी झाला आहे, अशी त्याची भावना बनली तर तो कदाचित पुढच्या हंगामात खेळणार नाही. वैभवने पहिल्याच सामन्यात यशस्वी जैस्वालबरोबर ५२ धावाची जबरदस्त भागीदारी केली तरी गुरुवारच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुविरुद्ध राजस्थान रॉयल्सचा संघ कमी पडला. (Vaibhav)

हेही वाचा :   

‘इस्रो’ चे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन निधन

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00