Home » Blog » Rampur UP : ११ वर्षीय मूक बधीर मुलींवर अत्याचार

Rampur UP : ११ वर्षीय मूक बधीर मुलींवर अत्याचार

हैवानाकडून सिगारेटचे चटके

by प्रतिनिधी
0 comments
Rampur UP

रामपूर : (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील रामपूर गावात ११ वर्षीय मूक बधीर मुलींवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अत्याचार करणाऱ्या हैवानाने मुलींला सिगारेटचे चटकेही दिल्याचे उघडकीस आले आहे. सध्या तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (Rampur UP)

या घटनेची माहिती अशी की, पिडित मुकबधिर मुलगी अनेकवेळा घरातून बाहेर पडायची आणि सायंकाळी उशिरा परतायची.  मंगळवारी सायंकाळी सहा वाजता ती घरातून निघाली पण रात्री उशिरापर्यंत ती आलीच नाही अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली. मुलीचा गावात शोध घेण्यात आला. मुलगी बेपत्ता झाल्याचे लाऊड स्पिकरवरुन सांगण्यात आले पण ती सापडली नाही. बुधवारी सकाळी ती गावाजवळच्या शेतात बेशुद्ध अवस्थेत सापडली. (Rampur UP)

संशयिताचे हैवानी कृत्य

मुलींवर अत्याचार झाले होते. तिच्या शरीरावर १७ ठिकाची चावा घेतल्याचे व्रण होते. तिला सिगारेटचे चटकेही देण्यात आले होते. मुलीला हैवानाने बेदम मारहाण केली होती. तिच्या चेहरा विद्रुप करुन हैवानाने पळ काढला होता. (Rampur UP)

संशयिताचा पोलिसांवर गोळीबार

दरम्यान पिडितेच्या नातेवाईकांनी रामपूर सैफनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी वेगाने हालचाली केल्यानंतर पिडितेच्या घराशेजारी दान सिंह याला अटक केली. जंगलामध्ये पोलिस त्याला अटक करण्यासाठी गेले असता त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी आत्मरक्षणासाठी गोळीबार केला. त्यात संशयित जखमी झाला आहे, अशी माहिती रामपूर पोलिसांनी दिली. (Rampur UP)

राहूल गांधीची उत्तर प्रदेश सरकारवर टीका

या घटनेची वृत्त बाहेर येताच लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहूल गांधी यांनी भाजप योगी सरकारवर टीका केली आहे. भाजपच्या दलित आणि महिलाविरोधी धोरणामुळे उत्तरप्रदेशात महिलांवर सातत्याने अत्याचार होत आहेत, असा घणाघात राहूल गांधी यांनी एक्स पोस्टवर केला आहे. (Rampur UP)

हेही वाचा :

महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00