Home » Blog » Revolver in district court : जिल्हा न्यायालयात रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

Revolver in district court : जिल्हा न्यायालयात रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

by प्रतिनिधी
0 comments
Revolver in district court

कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या व्यक्तीकडे रिव्हॉल्व्हर सापडल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुरेश संभाजी नरके (वय ४२ रा. वाठार तर्फ वडगाव ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे गुन्हा नोंद झालेल्या व्यकतीचे नाव आहे. (Revolver in district court)

आज सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता पोलिस कर्मचारी संजय रघुनाथ पारळे जिल्हा न्यायालय संकुलातील तिसऱ्या मजल्यावरुल जिल्हा व सत्र न्यायाधीश तांबे यांच्या कोर्टाच्या बाहेर बंदोबस्तास होते. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सुरेश नरके हे तांबे यांच्या कोर्टात त्यांच्या संबधित असलेल्या सुनावणीस आले होते. पोलिस कर्मचारी पारळे यांनी नरके यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे रिव्हॉल्वर मिळून आले. न्यायालयाच्या आवारात रिव्हॉल्व्हर, जिवंत राउंड, या वस्तू आणण्यास बंदी असतानाही ते घेऊन आले होते. न्यायालयाच्या आवारात रिव्हॉल्हर घेऊन आल्याने न्यायालयीन सुरक्षितता धोक्यात आणण्याच्या हेतून त्यांना दिलेल्या शस्त्र परवान्याच्या अटी व शर्तीचा भंग केल्याने पोलिस कॉन्स्टेबल संजय पारळे यांनी सुरेश नरके यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. (Revolver in district court)

पोलिसांनी सुरेश नरके यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू केली आहे.  सुरेश नरके यांच्यावर २०१८ मध्ये हल्ला झाल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून तीन आरोपीविरोधात कोर्टात आरोपपत्रही दाखल झाले. आजच्या सुनावणीच्यावेळी तिनही आरोपी कोर्टात उपस्थित असल्याची माहिती पुढे आली आहे. सुरेश नरके कोर्टाच्या आवारात कोणत्या उद्देशाने रिव्हॉल्व्हर घेऊन आले होते याचा तपास पोलिस करत आहेत. (Revolver in district court)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00