Home » Blog » 42 lakhs fraud : अतिरेकी संघटनांची भिती दाखवून डॉक्टर पिता पुत्राला ४२ लाखांचा गंडा

42 lakhs fraud : अतिरेकी संघटनांची भिती दाखवून डॉक्टर पिता पुत्राला ४२ लाखांचा गंडा

by प्रतिनिधी
0 comments
42 lakhs fraud

कोल्हापूर :प्रतिनिधी : अतिरेकी संघटनांनी बँक खात्याचा वापर केल्याची भिती दाखवून डॉक्टर पिता पुत्राला ४२ लाखाचा गंडा घातल्याची घटना घडली. कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. डॉ. महेश्वर दत्तात्रय शितोळे (वय ३५, रा. शितोळे हॉस्पिटल, राजारामपुरी) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरांचे नाव आहे. (42 lakhs fraud)

पोलिसांनी या गुन्ह्याची माहिती दिली.  डॉ. दत्तात्रय शितोळे हे राजारामपुरी पहिली गल्ली येथे शितोळे हॉस्पिटल असून त्यांचा मुलगा डॉ. महेश्वर शितोळे हॉस्पिटलमध्ये सहाय्यक असून त्यांची पत्नी डॉ. अक्षरा शितोळे या दंतवैद्यक असून राजारामपुरीत डेन्टल क्लिनिक चालवतात. तसेच डॉ. महेश्वर शितोळे हे वारणानगर येथे दमयंती हॉस्पिटलही चालवतात. (42 lakhs fraud)

९ ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजता डॉ. महेश्वर शितोळे यांना एक फोन आला. “मी कुलाबा, मुंबईतून बोलतो आहे. तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून एका भामट्याने तुमच्या नावाने आधारकार्ड व बँक पासबुक तयार केले असून त्याचा उपयोग अतिरेकी संघटनांना पैसे पाठवण्यासाठी केला आहे,” अशी भीती घातली. भविष्यात अडचणी टाळण्यासाठी नॅशनल सिक्युरिटी प्रोटोकॉल पाळावा लागेल.असे सांगून त्यांचा मोबाईल नंबर ब्लॉक करण्यात आला.

संदीप रॉय नावाचा अधिकारी हा डॉ. शितोळे यांना एकाच नंबरवरून व्हॉटस ॲप कॉल करीत होता. रॉय याच्या आपल्या अंगावरील खाकी वर्दी होती. कॉलमध्ये पोलीस ठाण्याची इमारत दिसत होती. रॉय नावाचा अधिकारी  सर्वोच्च न्यायालयाची अटकेची नोटीस दाखवत होता. तुमचे पैसे सुरक्षित आहेत. चौकशी संपल्यानंतर पैसे तुमच्या खात्यावर वर्ग केले जातील असा विश्वास त्यांनी दिल्याने  डॉ. शितोळे कुटुंबिय त्याच्या भूलथापांना फसले. (42 lakhs fraud)

व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलवर तोतयाने पोलिसांच्या वर्दीतले फोटो दाखवला. पुढे “तपास पूर्ण होईपर्यंत तुमचे पैसे सुरक्षित ठेवले जातील” असा विश्वास देत त्याने डॉ. महेश्वर शितोळे यांच्याकडून सुरुवातीला २६ हजार, नंतर ३० हजार रुपये ऑनलाईन स्वीकारले. त्यानंतर डॉ. दत्तात्रय शितोळे यांनाही कॉल करून “तुमच्या मुलाला अटक होईल” अशी भीती दाखवून ५ लाख ३५ हजार रुपये उकळले. त्याचबरोबर शेअर्स विक्री करण्यास भाग पाडत आणखी ३७ लाख रुपये आरटीजीएसद्वारे काढून घेतले.

२८ ऑगस्ट रोजी आरोपींनी पुन्हा ४० लाख रुपयांची मागणी केली. यानंतर शितोळे परिवाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांत गुन्हा दाखल असून , सायबर पोलीस ठाण्याचे  पोलिस निरीक्षक सतीश होगड  यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00