Home » Blog » इस्त्रायलच्या भीषण हल्यात लेबनॉन मध्ये २५० नागरिक ठार

इस्त्रायलच्या भीषण हल्यात लेबनॉन मध्ये २५० नागरिक ठार

by प्रतिनिधी
0 comments
250 civilians killed in Lebanon in a fierce Israeli attack

नवी दिल्ली : अमेरिका, इस्त्रायल आणि इराण मध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर इस्त्रायलने लेबनॉनवर केलेल्या भीषण हल्ल्यात २५० नागरिक ठार झाले. त्यामुळे  अमेरिका इराणमधील युद्धविराम धोक्यात आल्याची भिती व्यक्त केली जात आहे. या हल्ल्याचा ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशांनी या निषेध केला आहे. तर ब्रिटनने अमेरिका इराण युद्धविराम चर्चेत लेबनॉनचा समावेश करण्याची मागणी कली आहे. (250 civilians killed in Lebanon in a fierce Israeli attack)

अमेरिका इराण या दोन्ही देशांनी बुधवारी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर जगाने सुटकेचा सुस्कारा सोडला होता. पण इस्त्रायलने इराणसोबत शस्त्रसंधी असली तरी लेबनॉन बरोबर युद्ध सुरू राहण्याचे जाहीर केले होते. आज गुरुवारी इस्त्रालयने लेबनॉनवर केलेल्या भीषण हल्ल्यात २५० नागरिक ठार झाले असून ८९० जण जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर लेबनॉनने शेकडो निष्पाप, निशस्त्र नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या इस्त्रायली हल्ल्यामधील शहीद आणि जखमींच्या स्मरणार्थ राष्ट्रीय शोकदिन पाळयाची घोषणा केली आहे. इराणने अमेरिकेसोबतच्या शांतता करारात लेबनॉनचा समावेश करण्याची मागणी केली आहे. तसे न झाल्यास करारातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. मात्र या करारात लेबनॉनचा समावेश नसल्याचे इस्त्रालयने म्हटले आहे. (250 civilians killed in Lebanon in a fierce Israeli attack)

इस्त्रायली हल्ल्यामुळे अमेरिका इराण युद्धविरामाला गंभीर धोका झाला आहे असे मत संयुक्त राष्ट्र प्रमुख गुटारेस यांनी म्हटले आहे. ब्रिटनचे परराष्ट्र  सचिव इव्हेट कूपर यांनी मध्यपूर्वेतील शस्त्रसंधीमध्ये लेबनॉनच समावेश व्हावा, अशी ब्रिटनची प्रबळ इच्छा आहे असे मत व्यक्त केले. (250 civilians killed in Lebanon in a fierce Israeli attack)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00