Home » Blog » व्हॉटस्‌ॲपची १७ हजार खाती ब्लॉक

व्हॉटस्‌ॲपची १७ हजार खाती ब्लॉक

सायबर आणि डिजिटल फसवणूक टाळण्यासाठी कारवाई

by प्रतिनिधी
0 comments
Cyber security file photo

नवी दिल्लीः सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकेच्या घटना दररोज समोर येत आहेत. या घटनांमुळे नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी गृह मंत्रालयाच्या ‘आय फोर सी’ शाखेने मोठी कारवाई केली आहे. टीमने १७ हजार व्हॉट्सॲप अकाउंट ब्लॉक केले आहेत. त्यांच्यावर आर्थिक फसवणूक कॉल आणि डिजिटल अटक कॉलमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे. (Cyber security)

बंद केलेले बहुतेक क्रमांक कंबोडिया, म्यानमार, लाओस आणि थायलंडमधून सक्रिय होते. बऱ्याच काळापासून एजन्सी कंबोडिया, म्यानमार आणि लाओसमधून डिजिटल अटक आणि सायबर फसवणुकीशी संबंधित कॉल सेंटरची तपासणी करत होत्या. ‘आय फोर सी’ ही सायबर आणि डिजिटल गुन्हेगारी प्रतिबंधावर काम करणारी संस्था आहे. जी गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. व्हॉट्सॲप अकाउंट बंद करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक जानेवारी २०२४ मध्येच सुरू झाले. ज्याचा वापर अनेक फसवणुकीत झाला. त्यात ‘डिजिटल अटक समाविष्ट असते. तिथे पीडितांना असे भासवले जाते, की ते कायदेशीर तपासणीच्या अधीन आहेत. ही फसवणूक करण्यासाठी अनेक सिमकार्डचा वापर करण्यात आला. ज्याचा शोध घेणे खूप कठीण होते. त्यानंतरही तंत्रज्ञानाच्या मदतीने त्या क्रमांकांचे पत्ते सातत्याने ब्लॉक केले जात आहेत.

ही कारवाई करण्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. देशातील विविध राज्यांच्या पोलिस दलांनीही या कारवाईसाठी केंद्रीय यंत्रणांना मदत केली आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी सायबर फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशाच प्रकारे घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी याआधी स्काईप खाती ब्लॉक करण्यात आली होती. ही व्हॉट्सॲप खाती ब्लॉक केल्याने सायबर फ्रॉड नेटवर्कला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00