14
गडचिरोली : लोकशाहीच्या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह वयोवृद्ध मतदारांत दिसून आला. मुलचेरा तालुक्याच्या गोविंदरपूरच्या फुलमती बिनोद सरकार १११ वर्षांच्या या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन मतदान केले. (Maharashtra Election)
आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हीलचेअरची व्यवस्था केली. आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता. लोकशाहीच्या उत्सवात फुलमती सरकार या आजींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान केले. त्यांनी गृह मतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला. एवढेच नव्हे तर तिने आपल्या बांगला भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहनही केले.