महाराष्ट्र दिनमान डेस्क : कर्नाटकातील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये सात वर्षाच्या मुलाच्या चेहऱ्यावरील जखमेवर टाके घालण्याऐवजी फेविक्विक वापरल्याबद्दल नर्सला निलंबित करण्यात आले. राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नर्सला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.(wrong medication)
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील हनगल तालुक्यातील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्रात १४ जानेवारीला ही घटना घडली. सात वर्षाच्या गुरुकिशन अण्णाप्पा होसमानी याच्या गालावर खोल जखम झाली होती. त्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. नर्सने जखमेवर टाके न घालता त्यावर फेविक्विक लावले. पालकांनी नर्सच्या या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्ड केले, पण वर्षानुवर्षे ही पद्धत वापरली जाते. मुलाच्या चेहऱ्यावर कायमचे डाग पडण्यापेक्षा ही पद्धत बरी आहे, असा दावा संबंधित नर्सने केला. पालकांनी या प्रकरणी आरोग्य विभागाकडे तक्रार केली. या घटनेचा व्हिडिओ पुरावा म्हणून दाखल केला आहे.(wrong medication)
या घटनेची वाच्यता झाल्यावर सुरवातीला नर्स ज्योतीची हावेरी तालुक्यातील गुठ्ठल आरोग्य केंद्रात बदली करण्यात आली. पण या घटनेमुळे लोकांमध्ये संतापाची लाट उसळल्याने ज्योतीचे निलंबन करण्यात आले. ज्या मुलांला फेविक्विक लावले होते त्यांची तब्येत चांगली आहे. तसेच त्याच्यावर झालेल्या उपचारामुळे काही दुष्परिणाम होतील का यावर लक्ष ठेवण्यात असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.(wrong medication)
आरोग्य आणि कुटुंब कल्याण सेवा आयुक्त कार्यालयाने म्हटले आही की फेविक्विक हे नियमांनुसार वैद्यकीय वापरासाठी परवानगी नसलेले द्रावण आहे. सरकारी रुग्णालयात मुलांवर उपचार करण्यासाठी फेविक्विक वापरुन कर्तव्यात कसूर केल्याबद्दल जबाबदार नर्सला निलंबित करण्यात आले आहे. नियमानुसार चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा :
शेख मुजीबुर रहमान यांचे निवासस्थान पेटवले
प्राध्यापिकेने बांधली विद्यार्थ्यांशी लग्नगाठ!
: अमेरिकेतून शंभरावर भारतीयांची पाठवणी