Home » Blog » डोक्यावर सिलिंडर घेऊन काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा

डोक्यावर सिलिंडर घेऊन काँग्रेस महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा

by प्रतिनिधी
0 comments
Women's march on gas price hike

बेळगाव : प्रतिनिधी :  केंद्र सरकारने गॅस सिलिंडर दरवाढ केल्याच्या निषेधार्थ महिला काँग्रेस तर्फे डोक्यावर सिलिंडर घेऊन मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील भाजप सरकारच्या निषेधाच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. गॅस दरवाढ रद्द करा, अशीही मागणी यावेळी महिला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली. (Women’s march on gas price hike)

आखातातील अमेरिका इस्त्रायल आणि इराण युद्धामुळे जगावरील इंधनाचे संकट दाट होऊ लागले. नैसर्गिक वायूच्या उत्पादन आणि वाहतुकीवर मर्यादा आली आहे. जागतिक पातळीवर इंधनाच्या दरातही वाढ होऊ लागल्याने भारतात स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर दरात ६० रुपयांनी वाढ केली. केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसच्या महिला आघाडीने निदर्शने केली.  महिलांकडून गॅस दरवाढ रद्द करा मागणी करण्यात आली.गॅस दरवाढ रद्द केली नाही तर जनता तुम्हाला धडा शिकवेल असे माध्यमाशी बोलताना महिला काँग्रेस कार्यकर्त्याने सांगितले. (Women’s march on gas price hike)

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी महिलांना काही तरी चांगला संदेश देण्याऐवजी गॅस सिलिंडर दरवाढ करून महिलांचा अपमान केला आहे. गॅस दरवाढ केल्यामुळे सामान्य जनतेवर बोजा पडला आहे. सर्वसामान्य जनतेला जगणे अवघड झाले आहे अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. 

ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, प्रदीप एम. जे., राजा सलीम, मन्सूर अली अत्तार, ललिता माने, जयश्री माळगी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. (Women’s march on gas price hike)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00