Home » Blog » केरळच्या निमिषाने यमन देशात कुणाचा खून केला?

केरळच्या निमिषाने यमन देशात कुणाचा खून केला?

निमिषा प्रिया या यमनमध्ये काम करणा-या नर्सवर २०१७ मध्ये एक यमन नागरिक तलाल अब्दो मेहदी याची हत्या केल्याचा आरोप आहे.

by प्रतिनिधी
0 comments
Nimisha Priya File Photo

महाराष्ट्र दिनमान : केरळच्या पलक्कडची रहिवाशी असलेल्या निमिषा प्रिया या नर्सला यमनमध्ये खूनप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आहे. ज्या व्यक्तिचा खून केल्याचा आरोप तिच्यावर आहे, ती व्यक्ती कोण होती आणि तिने त्याचा खून का केला, यासंदर्भातील चर्चाही सुरू झाली आहे. भारत सरकारचे या प्रकरणावर लक्ष असून निमिषाच्या कुटुंबीयांना मदतीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जात असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे. (Nimisha Priya Yemen Case)

निमिषा प्रिया (Nimisha Priya Yemen Case) या यमनमध्ये काम करणा-या नर्सवर २०१७ मध्ये एक यमन नागरिक तलाल अब्दो मेहदी याची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याप्रकरणी तिला तेथील सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

निमिषा, २००८ साली नर्सचे काम करण्यासाठी यमनमध्ये आली होती. ती तेथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करत होते. काही दिवसांनी तिने तलाल अब्दो मेहदी याच्या सहका-याने स्वतंत्र क्लिनिक उघडले होते. उपलब्ध माहितीनुसार तलाल २०१५ मध्ये केरळमध्ये आला होता. त्याने निमिषाच्या लग्नाचे फोटो चोरले. आणि त्यात बदल करून निमिषाचे आपल्यासोबत लग्न झाल्याचा दावा त्याने केला.

निमिषाच्या आईने केलेल्या आरोपानुसार तलालने तिच्या मुलीचा पासपोर्ट काढून घेतला होता. जेणेकरून ती यमन सोडून जाऊ नये. तलाल ने आपल्या मुलीचा अनेक वर्षे छळ केल्याचा तिचा दावा आहे. तिला तो अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली ठेवत होता. तिच्या क्लिनिक आणि दागिन्यांवरही त्याने कब्जा केला होता. निमिषासाठी आपला पासपोर्ट परत मिळवणे महत्त्वाचे होते. त्यासाठी तिने तलालला बेशुद्ध करण्याची योजना बनवली होती. मात्र बेशुद्ध करण्याच्या औषधाची मात्रा अधिक झाल्यामुळे त्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी २०२० मध्ये यमनच्या न्यायालयाने निमिषाला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. २०२३ मध्ये सुप्रीम कोर्टाने ती कायम केली.

यमनमध्ये जाण्यास बंदी

यमनमध्ये अनेक वर्षांपासून गृहयुद्ध सुरू आहे. त्यामुळे २०१७ मध्ये भारत सरकारने आपल्या नागरिकांना तेथे जाण्यास बंदी घातली आहे. काही विशिष्ट परिस्थितीमध्येच भारतीय नागरिकांना यमनमध्ये जाण्यास परवानगी मिळते. निमिषाला शिक्षा झाल्यानंतर २०२३ मध्ये तिचे कुटुंबीय यमनला जाऊ इच्छित होते. मात्र परराष्ट्र मंत्रालयाने परवानगी दिली नाही.त्यावर त्यांनी दिल्ली हायकोर्टात अपील केले. त्यानंतर १३ डिसेंबर २०२३ ला हायकोर्टाने तिच्या कुटुंबीयांना यमनला जाण्यास परवानगी दिली. मात्र त्याचवेळी त्यांची केंद्र सरकारवर कोणतीही जबाबदारी राहणार नाही, असेही स्पष्ट केले.

चर्चेसाठी ३४ लाख, शिक्षामाफीसाठी साडेतीन कोटी

नोव्हेंबर २०२३ मध्ये चर्चा सुरू करण्यासाठी निमिषाच्या परिवाराने ४० हजार डॉलर (सुमारे ३४ लाख) रुपये भरले. प्रियाची मृत्यूदंडाची शिक्षा माफ करण्यासाठी तिच्या कुटुंबियांना चार लाख डॉलर (सुमारे साडेतीन कोटी रुपये) भरावे लागणार आहे. २०२० मध्ये सेव्ह निमिषा प्रिया इंटरनॅशनल काऊन्सिलची स्थापना करण्यात आली आहे. त्याच्यामार्फत ही रक्कम उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ब्लडमनीमुळे आशा

निमिषाला वाचवले जाऊ शकते, याबाबत तिचे कुटुंबीय आशावादी आहेत. त्यासाठी ब्लडमनीचा एक पर्याय आहे. यमनमध्ये शरिया कायदा आहे. या इस्लामी कायद्यानुसार गुन्हेगारांना काय शिक्षा द्यायची यासंदर्भात पीडित निर्णय घेऊ शकतात. हत्येच्या प्रकरणात पीडितांच्या कुटुंबीयांकडे हा अधिकार असतो.

हेही वाचा :

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00