Home » Blog » कौस्तुभ  गावडे व मयुरी  पाटील यांचा विवाह  संपन्न

कौस्तुभ  गावडे व मयुरी  पाटील यांचा विवाह  संपन्न

by प्रतिनिधी
0 comments
Wedding of Kaustubh Gawade and Mayuri Patil

कोल्हापूर  : येथील  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे पणतु व संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे नातू कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचा विवाह लहू कृष्णा पाटील यांची कन्या मयुरी यांच्याशी मोठया थाटामाटात  संपन्न झाला. मंगळवार ३ फेब्रुवारी रोजी महासैनिक दरबार हॉल येथे झालेल्या विवाह समारंभास मान्यवरांनी वधुवरांना आशीर्वाद दिले. (Wedding of Kaustubh Gawade and Mayuri Patil)

            यावेळी वधुवरांना खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, छत्रपती मालोजीराजे, संस्थेचे अध्यक्ष उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशिल माने, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी मा.अमोल येडगे, महानगरपालिकेच्या आयुक्त के.मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, पोलिस अधीक्षक  योगेशकुमार गुप्ता माजी खासदार निवेदिता माने, खासदार संजय मंडलिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, महादेवराव महाडिक, संजयबाबा घाटगे, ऋतुराज पाटील, जयश्री जाधव, डी.वा.पाटील विद्यापीठाचे संजय डी.पाटील, समरजितसिंह घाटगे, शिवाजी विद्यापीठाच्या प्र.कुलगुरु डॉ.ज्योती जाधव, माजी कुलगुरु माणिकराव साळुंखे, डॉ.डी.टी.शिर्के, पुणे विभागाचे शिक्षण संचालक शैलेश देवळाणकर, कोल्हापूर विभागाचे शिक्षण सहसंचालक डॉ.प्रकाश बच्छाव, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, प्राचार्य क्रांतीकुमार पाटील, मंजिरी देसाई,   माजी महापौर महादेवराव आडगुळे, आर.के.पोवार, सागर चव्हाण, सई खराडे,  दादा लाड, सुभाष नागेशकर,  माजी नगरसेवक सत्यजित कदम , प्रा.जयंत पाटील, नंदकुमार मोरे, नगरसेविका.रुपाराणी निकम, यांनी शुभेच्छा दिल्या. (Wedding of Kaustubh Gawade and Mayuri Patil)

याप्रसंगी संस्थेच्या सेक्रेटरी शुभांगी गावडे, एल.आय.सी. चे माजी अधिकारी मुरलीधर गावडे, कोल्हापूर जिल्हा विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, संस्थेचे सहसचिव (प्रशासन) प्राचार्य एस.एम.गवळी, संस्थेचे सहसचिव (अर्थ) प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या सहकारी पतसंस्थेचे चेअरमन हितेंद्र साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजी माजी आजीव सेवक, पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी तसेच विविध शिक्षण संस्थांचे संस्थापक, पदाधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते. (Wedding of Kaustubh Gawade and Mayuri Patil)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00