Home » Blog » Vasundhara Oswal: अब्जाधीशाच्या मुलीला तुरुंगात कसे वागवले?

Vasundhara Oswal: अब्जाधीशाच्या मुलीला तुरुंगात कसे वागवले?

युगांडातील तुरुंगात ‘ते’ दिवस…

by प्रतिनिधी
0 comments
Vasundhara Oswal

नवी दिल्ली : प्रतिनिधी : मूळ भारतीय अब्जाधीश पंकज ओसवाल यांची कन्या वसुंधरा ओसवाल यांना युगांडातील तुरुंगात त्रास देण्यात आला. तुरुंगातील झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी मौन सोडले आहे. वडिलांच्या माजी कर्मचाऱ्याचे अपहरण आणि खुनाचा खोटा आरोप करुन त्यांना तुरुंगात डांबले होते. ज्याच्या खुनाबद्दल आरोप केला होता तो जिवंत सापडल्यानंतरही पोलिसांनी वसुंधरा यांना त्रास दिला.  तुरुंगातील त्रासाबद्दल वसुंधरा ओसवाल यांनी ‘मानवी हक्कांचे घोर उल्लंघन’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. (Vasundhara Oswal)

वसुंधरा ओसवाल या २६ वर्षीय तरुणीला एक ऑक्टोबर २०२४ रोजी पंकज ओसवाल यांचे माजी कर्मचारी मुकेश मेनारिया यांच्या अपहरणप्रकरणी अटक केली होती, पण काही दिवसांनी टाझांनियामध्ये मुकेश मनेरिया जिवंत आढळला. त्या खटल्यातील हवा गेली होती. तरीही वसुंधरा काही आठवडे तुरुंगात होत्या. (Vasundhara Oswal)

‘पीटीआय’शी बोलताना त्यांनी त्यांच्यावर आलेल्या गुदरलेले भयंकर अनुभव सांगितले. त्या म्हणाल्या, “मला पाच दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोन आठवडे तुरुंगात टाकण्यात आले. आंघोळ करण्याची परवानगी नव्हती. अन्न पाणी नाकारले. माझ्या पालकांना मला मूलभूत गरजा मिळवून देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागली. शिक्षा म्हणून एकदा त्यांना शौचालयात प्रवेश नाकारण्यात आला.” (Vasundhara Oswal)

वॉरंटशिवाय त्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणी युगांडाच्या पोलिसांनी छापा टाकल्याचे वसुंधरा यांनी सांगितले. जेव्हा मी त्यांना सर्च वॉरंट सादर करण्यास सांगितले तेव्हा पोलिसांनी सांगितले की “आम्ही युगांडामध्ये आहोत. आम्ही काहीही करु शकतो. तुम्ही आता युरोपमध्ये नाही आहात.” त्यांना व्हॅनमध्ये कोंबून पोलिस घेऊन गेले.

पोलीस ठाण्यात वकिलांशिवाय त्यांना जबाब देण्यास भाग पाडले गेले. वसुंधरा म्हणाल्या, ३० हजार पौंड द्यावे लागले आणि जामिनासाठी पोलिसांकडे पासपोर्ट जमा करावा लागला. त्यांनी ताबडतोब वसुंधरांना पोलीस कोठडीत टाकले. न्यायालयाकडून बिनशर्त सुटकेचा आदेश मिळाल्यानंतर त्यांना ७२ तास बेकायदेशीरपणे अडकवून ठेवण्यात आले. (Vasundhara Oswal)

वसुंधरा यांना एक ऑक्टोबर २०२४ रोजी अटक झाली. ज्यांचे अपहरण झाले आणि त्यांचा खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला ते मनेरिया जिवंत आढळल्यानंतर खटला रद्द करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी त्यांना तुरुंगात ठेवले. उलट त्यांच्यावर अपहरण, खुनाचा प्रयत्न असे आरोप वाढवण्यात आले.

सुरवातीला किरकोळ गुन्हेगारासाठी असलेल्या तरुंगात ठेवण्यात आले. नंतर दोषी ठरलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आणि मानवी तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांच्या तुरुंगात डांबण्यात आले. नाकासोंगोला तुरुंगात जीवाच्या भितीने दोन आठवडे काढल्याचे वसुंधरा यांनी सांगितले. अनेक आठवड्याच्या कायदेशीर लढाईनंतर २१ ऑक्टोबर रोजी जामीन मिळाला. पण त्यांना सुटकेसाठी आणखी बरेच दिवस वाट पहावी लागली. दहा डिसेंबर रोजी त्यांना त्याचा पासपोर्ट परत देण्यात आला पण १९ डिसेंबरपर्यंत खटला रद्द करण्यात आला. (Vasundhara Oswal)

पोलिसांना पैसे हवे होते असा आरोप वसुंधरा ओसवाल यांनी केला. मनेरिया जिवंत सापडल्यानंतरही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी माझ्यावर गुन्हे वाढवले. ते आमच्याकडून अधिक पैसे उकळण्याचे प्रयत्न करत होते. या सर्व प्रकाराला युगांडा सरकारला त्यांनी दोषी धरले आहे. आम्ही युगांडात गुंतवणूक करुन ते आमच्याशी असे का वागतात? असा प्रश्नही वसुंधरा यांनी उपस्थित केला.

हेही वाचा :

बॉम्बच्या धमकीने विमान रोमला वळवले

महाकुंभहून परतताना गोकाकचे सहा भाविक ठार

शिक्षिकेला धडा शिकवण्यासाठी उचलले भयंकर पाऊल

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00