मुंबई : प्रतिनिधी : नाशिकच्या कुंभमेळ्यावर खर्च होणारा पैसा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरा. यामुळे देव काही रागावणार नाही, असा सल्ला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिला. (Use the funds allocated for the Kumbh Mela to tackle the drought)
राज्यात ४० दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिक हाताबाहेर गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. महायुतीतील मंत्री, नेते आणि विरोधी पक्षानील नेतेही दुष्काळग्रस्त भागाचे दौर करत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार राऊत यांनी महायुती सरकारला सल्ला दिला आहे.
कर्नाटक सरकारकडून दुष्काळ जाहीर
कर्नाटकातील काँग्रेस सरकारने दिल्लीतील केंद्रीय पथकाची वाट न पाहता दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्याऱ्या योजना जाहीर केल्या आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री शिवकुमार जातीने लक्ष घालून दुष्काळ निवारण्याच्या कामाचे मॉनिटरिंग करत आहेत. पण महाराष्ट्र सरकारमधील तीन पक्षात समन्वय नाही. कॅबिनेटमध्ये चर्चा नाही. शेतकऱ्यांचा अक्रोश मंत्रालयाच्या भिंती फाडून आत जात नाही. शेतकरी रस्त्यावर उतरलेल आणि मंत्रालयावर धडकेल अशी स्थिती आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (Use the funds allocated for the Kumbh Mela to tackle the drought)
कुंभेळ्यातील ३५ हजार कोटी दुष्काळाकडे वळवा
ते म्हणाले, नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी ५५ ते ६० हजार कोटींची गरज नाही. हे सर्व पैसे ठेकेदारांच्या घशात जाणार आहे. कुंभेळ्याचा खर्च कमी करा. राज्यावर दुष्काळाचे सुल्तानी संकट आले असेल तर आपण त्यात देवालाह सामिल करु घेऊ. जेवढा आवश्यक आहे तेवढाच खर्च कुंभमेळ्यासाठी करावा. बाकीचे ३० ते ३५ हजार कोटी दुष्काळग्रस्ताकडे वळवावे अशी सूचना त्यांनी केली.
देवाच्या नावावरील पैसे गुजरातचे ठेकेदार खाणार
शक्तीपीठ महामार्गावर होणारा खर्चही थांबवावा असे आवाहन राऊत यांनी सरकारला केले आहे. शक्तीपीठावरील खर्च ठेकेदारांना मिळणार आहे. त्यामुळे देव अजिबात रागवणार नाही. देवाच्या नावावर ते पैसे गुजरातचे ठेकेदार खाणार आहेत. मोदींच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या शेकडो कोटींचा खर्च दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वापरावा, अशी मागणीही राऊतांनी केली.
दुष्काळावरील मंत्रीमंडळाची बैठक लाईव्ह करा
दुष्काळावर होणारी मंत्रीमंडळाची बैठक लाईव्ह करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली. दुष्काळावर काय चर्चा झाली हे लाईव्ह केल्याने जनतेला कळेल. पत्रकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना बोलवा. सर्वासमोर चर्चा होऊ द्या अशी मागणीही राऊत यांनी केली. (Use the funds allocated for the Kumbh Mela to tackle the drought)