नवी दिल्ली : महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.(uproar in parliament)
सोमवारी लोकसभेत प्रश्नोत्तराचा तास सुरू होताच विरोधकांनी चेंगराचेंगरीचा मुद्दा लावून धरला. आणि ‘मोदी-योगी खुर्ची खाली करा’, ‘मोदी-योगींनी थोडीतरी लाज बाळगावी,’ अशी घोषणाबाजी सुरू केली.
विरोधी सदस्य काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना प्रश्नोत्तराचा तास कधीही खंडित होऊ देऊ नका, सभागृहाची प्रतिष्ठा कायम ठेवा, असे आवाहन केले. (uproar in parliament)
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात नुकत्याच झालेल्या चेंगराचेंगरीत ३० भाविक ठार झाले आहेत. अनेकजण जख्मी झाले आहेत. हा मुद्दा विरोधी खासदारांनी लोकसभेत लावून धरल्याने सोमवारी संसदेचे कामकाज गोंधळातच सुरू झाले.
अध्यक्ष बिर्ला यांनी विरोधी सदस्यांच्या या आक्रमक पवित्र्यावर संताप व्यक्त केला. मतदारांनी तुम्हाला प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात पाठवले आहे की टेबल फोडण्यासाठी?, असा संतप्त सवाल केला.
त्यानंतरही घोषणाबाजी सुरूच होती. तासाच्या शेवटी, बिर्ला यांनी सदस्यांना, प्रश्नोत्तराचा तास कधीही खंडित होऊ देऊ नका आणि त्या कालावधीनंतर त्यांना हवे ते मुद्दे उपस्थित करा. ते पुढे म्हणाले की राष्ट्रपतींच्या अभिभाषणासाठी धन्यवाद प्रस्तावादरम्यान सर्व मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात, असे सांगितले. (uproar in parliament)
ते म्हणाले, मी सर्वांना विनंती करू इच्छितो की, तुम्हाला जो काही मुद्दा मांडायचा आहे, तो राष्ट्रपतींच्या भाषणाच्या चर्चेदरम्यान उपस्थित करा… प्रश्नोत्तराचा तास कधीही वाचा जाऊ देऊ नका. ही तुम्हा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रश्नोत्तराचा तास चालू द्या. रात्री १२ नंतरही आपले मुद्दे मांडावेत. ही परंपरा चालू ठेवा, ही माझी विनंती आहे. पण तुम्हाला ओरडायचे असेल, तुम्हाला टेबले वाजवायची असतील तर मी काहीही बोलू शकत नाही, अशी उद्विगनताही बिर्ला यांनी व्यक्त केली.
हेही वाचा :