कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यात सर्वत्र पावसाने जोर धरला असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्याची विकासगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राधानगरी धरण भरले असून धरणाचे चार स्वयंचलित दरवाजा उघडले आहेत. स्वयंचलित दरवाजे आणि पॉवर हाऊसमधून ७२१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागला असून नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडल्याने ३१ बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवली आहे. (Radhanagari dam filled)
राज्यात पालघर, पुणे घाट, चंद्रपूर, गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे. मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नाशिक घाट, सातारा घाट, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, जळगाव, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, धुळे, नाशिक, नंदुरबार, संभाजीनगर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, बीड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. (Radhanagari dam filled)
कोल्हापूर जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडत आहे. धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे ओढे नाले वाहू लागले आहेत. काल शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास राधानगरी धरणाचे तीन स्वयंचिलत दरवाजे उघडले. त्यानंतर पहाटे एक दरवाजा खुला झाला. धरणाच्या क्रमांक तीन, चार, पाच आणि सहा मधून ५७१२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. वारणा आणि कुंभी नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला असल्याने कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात तुफान अतिवृष्टी सुरू आहे. चंदगड जिल्ह्यातील घटप्रभा धरणक्षेत्रात अतिवृष्टी झाली असून २०१५ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी तालुक्यातील राधानगरी धरणक्षेत्रात १४६ मिली मीटर, तुळशीमध्ये ७३, दूधगंगा मध्ये १०१, धामणीमध्ये १२२ मिली मीटर पाऊस पडला आहे. गगनबावडा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोदे लघुपाटबंधारे क्षेत्रात १६० मिली मीटर, कुंभीत ९० मिलीमीटर पाऊस पडला आहे. शाहूवाडी तालुक्यातील कासारी धरणक्षेत्रात १९६, कडवीत १२३ मिलीमीटर पाऊस पडला आहे. पाटगाव धरणक्षेत्रात १४० मिली मीटर पाऊस पडला आहे. (Radhanagari dam filled)