Home » Blog » Trump Putin meeting in Alaska : ट्रम्प पुतीन तीन तास भेट, भारताची अनिश्चितता वाढली

Trump Putin meeting in Alaska : ट्रम्प पुतीन तीन तास भेट, भारताची अनिश्चितता वाढली

by प्रतिनिधी
0 comments
Trump Putin meeting in Alaska

वॉशिग्टंन : अलास्का येथे अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात सुमारे तीन तास बैठक झाली. पण बैठकीत कोणताच करार झाला नसल्याने चर्चा अनिर्णीत राहिली. युक्रेमनमधील रशियाचे युद्ध संपवण्याबाबत पुतीन यांच्याशी कोणताही करार केला नाही असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.  बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पुतीन यांनी रशिया युक्रेन युद्धाबाबत कोणतेही भाष्य केले नाही. ट्रम्प यांनी रशियाकडून खरेदी करणाऱ्या देशांवर सध्या तरी कर लावणार नसल्याचे सांगितले असले तरी भविष्यात कर लावला जाईल असे सांगितल्याने भारत अमेरिका व्यापार संबधाबद्दल अनिश्चितता राहणार आहे. (Trump Putin meeting in Alaska)

युक्रेमनमधील रशियाचे यद्ध संपवण्याच्या बाबत बंद दाराआड वरिष्ठ सल्लागारांसोबत चर्चा केल्यानंतर टॅम्प आणि पुतीन संयुक्त पत्रकार परिषद घेतली. बैठकीनंतर १२ मिनिटाच्या पत्रकार परिषदेत पुतीन यांनी युद्धबंदी संदर्भात एकही शब्द बोलले नाहीत. त्यांनी रशियाने ताब्यात घेतलेल्या प्रदेशावर ताबा ठेवण्याचा दावा अप्रत्यक्षरित्या मांडला. नाटोचा विस्तार हे रशियाचे चिंतेचे मूळ करण असून शांतता करार होण्यापूर्वी ते दूर करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. (Trump Putin meeting in Alaska)

एरव्ही पत्रकार परिषदेत बिनधास्त बोलणारे ट्रम्प यांनी धाडसी विधान केली नाहीत. तीन तासाच्या चर्चेत मोठी प्रगती झाली असल्याचे सांगितले. युक्रेनमधील रशियाचे युद्ध संपवण्यासाठी त्यांनी पुतीन यांच्यात कोणताही करार झाला नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.  रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशाबद्दल ट्रम्प म्हणाले अशा देशांवर दुय्यम निर्बंध किंवा शुल्क आकारावे लागेल. जर मला करावे लागले तर मी करेन, कदाचित मला ते करावे लागणार नाही असे त्यांनी म्हणल्याने त्यांनी भारताला संभ्रमात टाकले आहे. ट्रम्प म्हणतात की त्यांना ‘दोन किंवा तीन आठवड्यात’ रशियन तेल खरेदीदारांवर कर लावण्याबद्दल विचार करावा लागू शकतो. (Trump Putin meeting in Alaska)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00