Home » Blog » Train accident : रेल्वे अपघातात १२ प्रवासी ठार

Train accident : रेल्वे अपघातात १२ प्रवासी ठार

ट्रेनला आग लागल्याच्या भीतीने रूळावर थांबलेल्या प्रवाशांना चिरडले

by प्रतिनिधी
0 comments
Train accident

जळगाव : जळगाव जिल्ह्यात कर्नाटक एक्स्प्रेसने दिलेल्या धडकेत पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या १२ जणांचा मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरली. प्रवाशांनी गाडीची साखळी ओढली. गाडी थांबल्यानंतर भीतीने काही प्रवाशी बाहेर पडले. (Train accident)

त्यातील काही प्रवासी खाली येऊन रूळावर थांबले होते. या दरम्यानच वेगाने आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना चिरडले. त्यात १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांची आकडा वाढण्याची शक्यता आहे. (Train accident)

जळगाव-पाचोरा दरम्यान परधाडे गावाजवळ ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. रेल्वे डब्याला आग लागल्याच्या अफवेने जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने अनेकांना उडवले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसच्या गाडीच्या चाकातून आग दिसून लागल्याने आगीची अफवा पसरली. डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. त्याच वेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव कर्नाटक एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडले. परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्स्प्रेसच्या मोटरमनने ब्रेक दाबल्याने एक्स्प्रेसच्या चाकांमधून आगीच्या ठिगण्या उडाल्या. (Train accident)

मुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रध्दाजंली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत महाराष्ट्र सरकारच्यावतीने देण्यात येईल. जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील. जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन, तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली माहिती

मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील धनराज नीला यांनी घटनेबद्दल दिलेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेस लखनौकडून मुंबईकडे येत असताना आग लागल्याची अफवा पसरली. काही प्रवासी ट्रेनमधून खाली उतरले. त्याचवेळी कर्नाटक एक्स्प्रेस तेथून विरुद्ध दिशेने जात होती.  या गाडीने काही प्रवाशांना धडक दिली आहे. अपघाताच्या वृत्तानंतर वैद्यकीय व्हॅन भुसावळहून रवाना झाली असून ती लवकरच घटनास्थळी पोहोचेल. कर्नाटक एक्सप्रेसने आपला पुढचा प्रवास पुन्हा सुरू केला आहे. जखमी प्रवाशांना मदत केल्यानंतर पुष्पक एक्स्प्रेस पुढे सोडण्यात येईल.

हेही वाचा :

पाणी कनेक्शन तोडणाऱ्याला मारहाण

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00