हैदराबाद : आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमाला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) बोर्डाने १८ कर्मचाऱ्यांची बदली केली आहे. ‘गैर-हिंदू धार्मिक कार्यक्रमात भाग घेतल्या’मुळे ही कारवाई केल्याचे देवस्थानने म्हटले आहे.(Tirupati employee)
यायसंबंधीचा आदेश नुकताच टीटीडीने काढला आहे. यांपैकी सहा कर्मचारी विविध टीटीडीच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक आहेत. इतरांमध्ये एक उप कार्यकारी अधिकारी (कल्याण), एक सहायक कार्यकारी अधिकारी, एक सहायक तांत्रिक अधिकारी (इलेक्ट्रिकल), एक वसतिगृह कर्मचारी, दोन इलेक्ट्रीशियन आणि दोन परिचारिका यांचा समावेश आहे. (Tirupati employee)
नोव्हेंबरमध्ये झालेल्या बैठकीत गैर-हिंदू कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि राजकीय भाषणांवर बंदी घालण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यानंतर दोनच महिन्यात ही कारवाई करण्यात आली. टीटीडीचे विद्यमान अध्यक्ष बी. आर. नायडू यांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.
बदली झालेल्यांमध्ये तिरुपती येथील एसव्ही आयुर्वेदिक महाविद्यालयातील प्रा. डॉ. के. व्ही. विजया भास्कर रेड्डी, तिरुपती येथील एसपीडब्ल्यू पदवी आणि पीजी महाविद्यालयातील व्याख्याते आणि प्राचार्य के. सुजाथा आणि जी असुंथा; एसजीएस कला महाविद्यालयाचे व्याख्याते के प्रताप; एस. व्ही. कला महाविद्यालयाचे व्याख्याते के माणेकशॉ दयान आणि तिरुपती येथील एसव्ही आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ रेणू दीक्षित यांचा समावेश आहे. उप कार्यकारी अधिकारी (कल्याण विभाग, टीटीडी) ए. आनंदा राजू आणि सहाय्यक ईओ (लिलाव) ए. राजशेकर बाबू यांचीही देखील बदली करण्यात आली आहे. (Tirupati employee)
देवस्थानचे कार्यकारी अधिकारी जे. श्यामला राव यांनी जारी केलेल्या आदेशात बोर्डाने म्हटले आहे की, १८ कर्मचाऱ्यांची अन्य पदांवर बदली करण्यात आली आहे. ते पुढे म्हणतात की, भगवान वेंकटेश्वराचे समर्पित सेवक आणि टीटीडीचे सर्व कर्मचारी शतकानुशतके पाळत आलेल्या परंपरा आणि मूल्यांचे पालन करून मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी आणि भक्तांच्या श्रद्धा आणि भावना जपण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
हेही वाचा :
अमेरिकेतून शंभरावर भारतीयांची पाठवणी