Home » Blog » जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी; कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी; कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये खळबळ

by प्रतिनिधी
0 comments
Threat to blow up Collector's office with RDX

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला हा ई मेल प्राप्त झाला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय खाली करण्यात आले. पोलिस दलाच्या बॉम्बशोधन पथकाने तपासणी केल्यानंतर धमकी पोकळ असल्याचे लक्षात आल्यावर समाधानाचा सुस्कारा टाकला. (Threat to blow up Collector’s office with RDX)

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत मेलवर जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात लावलेल पाच आरडीएक्स बॉम्ब फुटणार आहेत, दुपारी दोन वाजेपर्यंत कार्यालय रिकामे करा आणि नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवा, अशी धमकी देणारा ई मेल ११ वाजून २८ मिनिटांनी प्राप्त झाला. त्यानंतर सर्व अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयाबाहेर पडले.  त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पोलिस दलाशी संपर्क साधल्यानंतर अधिकारी व पोलिस कर्मचारी, बॉमबशोधक आणि नाशक पथक, अग्निशमन दल जिल्हाधिकारी कार्यालयात पोचले. सर्व विभागांची तपासणी करण्यात आली. कुठेही बॉम्ब मिळून आला नाही, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी दिली. (Threat to blow up Collector’s office with RDX)

तपासणी झाल्यानंतर काहीही न आढळल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व काम पुन्हा सुरळीत झाले. पण धमकीची चर्चा जिल्ह्यात नव्हे तर राज्यात पसरली होती. (Threat to blow up Collector’s office with RDX)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00