इस्लामपूर : प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. इस्लामपूर मतदार संघात मतदारांना बदल हवा आहे. त्यादृष्टीने गावागावांतून परिवर्तनासाठी उठाव झाला आहे. प्रत्येकातील उत्स्फूर्तपणा आणि ऊर्जा विजयापर्यत पोहचवेल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील यांनी व्यक्त केला. (Nishikant Patil)
भोसले-पाटील यांनी शाळा क्र.एक येथे सहकुटुंब जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या सोबत आई शशिकला भोसले-पाटील, पत्नी सुनीता, कन्या प्रांजली, मुलगा प्रत्युष उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, इस्लामपूर मतदार संघात महायुतीतील घटक पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे मोठ्या मताधिक्यांनी आमचा विजय होईल, असा विश्वास आहे.