Home » Blog » Terror at gunpoint : गणेश मिरवणकीतील वादानंतर बंदुकीचा धाक दाखवून दहशत

Terror at gunpoint : गणेश मिरवणकीतील वादानंतर बंदुकीचा धाक दाखवून दहशत

by प्रतिनिधी
0 comments
Terror at gunpoint

कोल्हापूर : प्रतिनिधी : गणेश आगमन मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून एका तरुणाने थेट बंदूक रोखल्याने खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली. रणजित राजाराम गवळी (वय ३९) चेतन राजाराम गवळी (वय ३६.रा.सहजीवन सोसायटी,आर.के.नगर) या दोघां सख्या भावासह अरुण संभाजी मोरे (वय २९.रा.बापूरामनगर ,कळंबा) या तिघांना पोलिसांनी अटक केली. (Terror at gunpoint)

कोल्हापूर शहरानजीक असलेल्या  आर.के.नगर ते पाचगाव रोड वरुन बळवंत मंडळाची गणपतीची आगमन मिरवणूकीत  जल्लोषात सुरू होती. या मिरवणुकीत नाचत असताना ऋषीकेश भोसले आणि रणजीत गवळी,चेतन गवळी आणि त्यांचा साथीदार अरुण मोरे यांच्याशी किरकोळ वाद झाला.त्यानंतर मिरवणूक पुन्हा सुरु झाली. मिरवणुकीनंतर ऋषीकेश भोसले हा रात्री दीडच्या सुमारास घरी जात असताना कारमधून रणजीत गवळी आणि अरुण मोरे आले. त्यांनी कार मध्ये ठेवलेली बंदुक बाहेर काढून ऋषीकेश यांच्या डोक्याला  लावून तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून ठार मारण्याची धमकी देऊन निघून गेले. (Terror at gunpoint)

घाबरलेल्या ऋषीकेशने या घटनेची तक्रार करवीर पोलिस ठाण्यात दिली.करवीर पोलिसांनी  दिलेल्या तक्रारीनूसार गुन्हा दाखल केला.घडलेल्या घटने बाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण कडील पोलिस अंमलदार सत्यजित तानूगडे यांना माहिती मिळाली की ,ऋषीकेश याला धमकी देणारे बंदूक घेऊन त्यांच्या कार मधून पाण्याचा खजिना येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने मंगळवारी रणजित गवळी,चेतन गवळी या दोघां सख्या भावासह त्यांचा मित्र अरुण मोरेसह तिघांना अटक केली. या तिघांना पुढ़ील तपासासाठी करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस  उपनिरीक्षक शेष मोरे पोलिस अंमलदार सत्यजित तानूगडे,प्रविण पाटील,दिपक घोरपडे आणि अरविंद पाटील या पथकाने संशयितांना अटक केली. (Terror at gunpoint)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00