कोल्हापूर : प्रतिनिधी : गोकुळच्या शासननियुक्त संचालकांना मतदानाच्या अधिकारावरुन विरोधी पक्षांनी भाजप महायुतीवर टीकेची राळ उडवली आहे. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी उडी घेतली आहे. गोकुळमध्ये भाजपकडून मतचोरी केली जात आहे असा आरोप राहूल गांधी यांनी केल्याने गोकुळ अध्यक्षपद निवडणुकीचा मुद्दा आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. राहूल गांधींनी केलेल्या पोस्टबद्दल काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आभार मानले आहे. (Rahul Gandhi’s post on X regarding the Gokul issue)
राहूल गांधी यांनी एक्स वर पोस्ट केली आहे. पोस्टमध्ये राहूल गांधींनी असे म्हटले आहे की, “गोकुळमध्ये दूध उत्पादकांनी भाजपाला हरवलं. तर भाजपानं निवडणुकीनंतर नियम बदलून टाकले. चार संचालक घुसवा, १२ चे १६ करा, बहुमत चोरा. ही दूध उत्पादकांच्या मताची चोरी आहे. जनदेशात भेसळ आहे. भाजपा इतकी हतबल झाली आहे की प्रत्येक ठिकाणि सत्ता वाचवण्यासाठी कुठल्याही थराला जात आहे. दूध उत्पादकांच्या मतांची चोरी करणाऱ्यांनी लक्षात ठेवावं, शेतकरी हे विसरणार नाहीत अस राहूल गांधींनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Rahul Gandhi’s post on X regarding the Gokul issue)
राहूल गांधींच्या पोस्टबद्दल आमदार सतेज पाटील यांनी त्यांचे आभार मानले आहेत. त्यांनी राहूल गांधीच्या पोस्ट वर आभार व्यक्त करणारी पोस्ट केली आहे. धन्यवाद राहूलजी, कोल्हापूरच्या साडेपाच लाख दूध उत्पादकांचा आवाज बनण्यासाठी गोकुळचा जनादेश शेतकऱ्यांचा आहे. आम्ही कोर्टातही लढू आणि रस्त्यांवरही लढू अशी पोस्ट केली आहे. (Rahul Gandhi’s post on X regarding the Gokul issue)