मुंबई : प्रतिनिधी : महानगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या टीकेला धार आली आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर टीका केली आहे. शिंदेची सेना ही अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे, अशी टीका केली आहे. (Shinde’s army is Amit Shah’s test-tube baby)
शिवतीर्थावर सभा घेण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरेंनी मागणी केली आहे. तसेच शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडूनही शिवतीर्थावर सभा घेण्यासाठी दावा करण्यात आला आहे. याबाबत पत्रकारांनी खासदार संजय राऊत यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, शिवतीर्थावर अशा प्रचाराच्या सांगतेच्या किंवा सुरुवातीच्या सभा फक्त शिवसेनाच घेत आली आहे. शिंदे गटाचा शिवतीर्थाशी काय संबंध आहे, हे एकदा त्यांनी सांगावे. अमित शहांनी तुमच्या ताब्यात पक्ष दिला म्हणजे, तुमचा शिवतीर्थाशी संबंध नाही. तुम्ही अमित शहांची टेस्ट ट्यूब बेबी आहात. तुमचा नॅचरल जन्म नाही. निवडणूक आयोगाचे डॉक्टर, सर्वोच्च न्यायालयाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन त्यांना जन्माला घातले आहे. पण ते तात्पुरते डॉक्टर आहेत. त्यामुळे शिवतीर्थावर सभा घेणार, अशी गर्जना त्यांनी करू नये, अशी टीका राऊत यांनी केली आहे. (Shinde’s army is Amit Shah’s test-tube baby)
भाजपाने शिवतीर्थावर कधी सभा घेतल्या? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला. शिवतीर्थाशी केवळ ठाकरेंचाच संबंध आहे. त्यामुळे आम्ही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेली मागणी ही नैतिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या योग्य आहे, असे यावेळी राऊतांकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे आता मुंबई महानगरपालिकेकडून शिवतीर्थावर सभा घेण्यासाठी कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाकडून परवानगी देण्यात येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Shinde’s army is Amit Shah’s test-tube baby)