मुंबई : प्रतिनिधी : शिक्षण, पाणी, न्याय आणि हक्कांसाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाही. ते तुम्हालाच लखलाभ असू द्या, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांच्यावर केली. (Awahad slaps MNS)
मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी कुठल्याही महाजनची गरज नाही, असा टोलाही त्यांनी मारला.
ठाणे येथे तुळजाभवानी मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी शरद पवार यांनी एक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते माझ्या बाबतीत अर्धसत्य सांगितले पण मी लहानपणापासून पूजा करतो. मुख्यमंत्री असताना तीन ते चार वेळा पंढरपूरच्या विठ्ठलाची पूजा केली. त्याचबरोबर तुळजापूरलाही जाऊन पूजा करतो. शरद पवार यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रकाश महाजन यांनी पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली होती. महाजन म्हणाले, “शरद पवार म्हणाले लहानपणी देवपूजा करत होते. आर्टिफिशियल इंटरलिजन्स तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ते त्यांची मुंज झालेली पण दाखवू शकतात” प्रकाश महाजन म्हणाले, शरद पवारांच्या लक्षात आले आहे की हिंदू धमपासून दूर जाऊन राजकारण करता येत नाही. जितेंद्र आव्हाड यांना तुळजाईचं मंदिर बांधावे लागले. ही हिंदूची ताकद आहे. (Awahad slaps MNS)
प्रकाश महाजन यांच्या वक्तव्यावर आव्हाड यांनी टीका केली. तसेच तुळजाभवानी मंदिराबाबत खुलासाही केला. ते म्हणाले, “२००४ मध्ये तुळजाभवानी मंदिर उभारले होते. पण रहदारीच्या रस्त्यात असल्यामुळे तत्कालिन महानगरपालिका आयुक्त आणि न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार सदर मंदिराचा आम्ही जिर्णोद्धार करण्याचा मानस केला. बांधकामाची परवानगी मागून बांधलेले हे राज्यातील पहिले मंदिर असेल. त्यामागे माझी तुळजाभवानीवरील नितांत श्रध्दा आहे”. (Awahad slaps MNS)
जितेंद आव्हाड प्रकाश महाजन यांच्यावर टीका करताना म्हणाले, “समस्त बहुजनांची उभ्या महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या तुळजाभवानी आईचे प्रति तुळजापूर देऊळ असंख्य भक्ताचे श्रध्दास्थान ठरेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे देखील तुळजाभवानी मंदिर प्रेरणास्थान होते. तुळजाभवानीचे उभ्या महाराष्ट्राला मोगलाईच्याविरोधात उभे ठाकण्याची ताकद दिली. आमच्यासारख्या बहुजनांना तुमच्यासारख्यांनी वंचित ठेवले. शिक्षण, पाणी, न्याय आणि हक्कासाठी आम्हासारख्यांना मुंज करण्याची आवश्यकता नाही. ते तुम्हालाच लखलाभ असू द्या”. मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी कुठल्या महाजन ची गरज नाही असा टोलाही आव्हाड यांनी महाजन यांना मारला.
हेही वाचा :
देश संतापात, पंतप्रधान मनोरंजनात
पंकजा मुंडेना अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत