कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून दिली जाणरी ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’ ही गुणवंत विद्यार्थ्याला मिळणारी केवळ आर्थिक मदत नसून, ती त्याच्या आयुष्यात आत्मसन्मान, आत्मविश्वास आणि आशेचा नवा प्रकाश निर्माण करेल, त्यांना नवी उर्जा व प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन डीएमआयएचईआरचे प्रो-चॅन्सलर व चीफ अॅडव्हायझर डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. सौ.शांतादेवी डी. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन तळसंदे येथील डॉ. डी वाय पाटील एज्युकेशनल सिटी येथे झालेल्या कार्यक्रमात २३० विद्यार्थ्यांना ‘सौ. शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप’चे वितरण करण्यात आले. या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिश्रा बोलत होते.
डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला डी वाय पाटील विद्यापीठ,पुणे चे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र. कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, मेघराज काकडे, शांतीनिकेतनच्या संचालिका सौ. राजश्री काकडे, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील व देवश्री पाटील उपस्थित होते. (Shantadevi Patil Merit Scholarship)
डॉ. वेद प्रकाश मिश्रा पुढे म्हणाले की, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची दूरदृष्टी आज अधिकच सुसंगत ठरते. २१ वे शतक भारताचे असेल, तर शिक्षणातून घडवलेल्या गुणवत्तापूर्ण मानव संसाधनामुळे होईल. यासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांचा समन्वय साधणारी संस्थात्मक रचना उभी राहणे गरजेचे आहे. या स्कॉलरशिपच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्याचा डॉ. संजय डी. पाटील व आमदार सतेज पाटील यांचा हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. (Shantadevi Patil Merit Scholarship)
डॉ. संजय डी.पाटील म्हणाले की, गुणवत्ता पूर्ण शिक्षण, उत्तम पायाभूत सुविधा, नवनवे अभ्यासक्रम व संशोधन यावर आमचा विशेष भर आहे. तळसंदे येथील या कॅम्पसमध्ये ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेत आहेत. सौ शांतादेवी डी. मेरीट स्कॉलरशिपमुळे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढीसाठी निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून अधिकाधिक गुणवंत विद्यार्थी घडतील याची खात्री आहे. (Shantadevi Patil Merit Scholarship) यावेळी वैजयंती संजय पाटील, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, भारत चव्हाण पाटील, श्वेता पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आकुर्डीचे कुलगुरू डॉ. मनीष भल्ला, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए, के, गुप्ता, डॉ. पी. बी. साबळे, डॉ. भालबा विभुते, सी. एच आर ओ. श्रीलेखा साटम, मानसिंगराव पाटील, देवराज पाटील उपस्थित होते. विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. रेणुका तुरंबेकर, डॉ. मारुती देवकर यांनी केले. कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी आभार मानले