कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा खुला गट कॅरम स्पर्धेत सम्राट लकडेने गतविजेत्या रोहित चौगुलेला अटीतटीच्या लढतीत हरवले. सरळ दोन गेममध्ये १३ /१२, २१ /१८ अशा फरकाने घेऊन सम्राटने मागील पराभवाचे उट्टे काढून अजिंक्यपद मिळविले. लकडेला रोख बक्षीस रूपये पाच हजार तर उपविजेता रोहित चौगुले यास रोख तीन हजार रुपये आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या आधी झालेल्या उपांत्य फेरीत सम्राटने इक्बाल बागवानचा २५ /०८, २५/०२ असा पराभव केला.(Kohapur District Carrom)
दुसऱ्या उपांत्य फेरीत रोहित चौगुले अणि सबज्युनिअर राज्य विजेता (१२ वर्षे) ओमकार वडर यांच्यात अटीतटीची लढत उपस्थित क्रीडा रसिकांना पहायला मिळाली. केवळ अनुभवाच्या जोरावर रोहितने २५/१५ ,१७ /२४, २२/१७ असा तिसरा गेम जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
यावेळी कॅरम असोसिएशनचे सचिव आणि श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते विजय जाधव यांनी आपल्या भाषणात ओमकार वडर हा काही वर्षांत भारतीय कॅरम संघाचे प्रतिनिधित्व करेल, असा विश्वास व्यक्त केला. (Kohapur District Carrom)
तृतीय क्रमांकाचे रोख दोन हजाराचे बक्षीस इक्बाल बागवान यांनी मिळविले तर चतुर्थ क्रमांकाचे एक हजाराचे बक्षीस ओमकार वडर
मिळविले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सावली केअरचे प्रमुख किशोर देशपांडे, यांच्या हस्ते करण्यात आला.
स्पर्धेसाठी राष्ट्रीय पंच सूर्यकांत पाटील, बोर्ड रेफरी म्हणून नामदेव टमके, श्रीकांत कोल्हे, राजू वडर, मंजूर शेख यांनी काम केले. या स्पर्धेचे नियोजन सावली केअर सेंटरचे चेतन, अर्जुन, कुणाल, योगेश, संग्राम कांबळे, श्रीकांत कोल्हे, ॠषीकेश देशपांडे यांनी केले.
कॅरम बोर्ड व्यवस्था अख्तर शेख यांनी केली. सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन प्रा.विराज जाधव यांनी केले. (Kohapur District Carrom)
यावेळी नवी मुंबई (ठाणे) येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी कॅरमपटूंची निवड असोसिएशनचे सदस्य प्रा.विराज जाधव यांनी जाहीर केली. ते असे
- पुरुष खुला गट : सम्राट लकडे, रोहित चौगुले, इक्बाल बागवान, ओमकार वडर, अख्तर शेख, मंजूर शेख
- प्रौढ गट : शिवशंकर भस्मे, संतोष देशपांडे
- प्रौढ महिला गटात राष्ट्रीय विजेत्या शोभा कामत तर महिला गटात ऐश्वर्या पाटील कोल्हापूर जिल्हा कॅरम संघाचे प्रतिनिधित्व करतील.
हेही वाचा :
वैभवची विक्रमांना गवसणी
बुमराह म्हणतो, मलिंगाच सरस!