नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान तणावामुळे बंद ठेवण्यात आलेली ३२ विमानतळे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाणे ९ मे ते १५ मे पर्यंत स्थगित करण्यात आली होती.(Airports set to reopen)
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात तात्पुरती बंद करण्यात आलेली ही नागरी उड्डाणे पुन्हा सुरू होतील, अशी घोषणा भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) सोमवारी (१२) मे रोजी केली.
या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजना वाढवण्यात आल्या आहेत.
शनिवारी, भारत आणि पाकिस्तानने जमीन, हवाई आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाया तात्काळ थांबविण्याचा करार केला. (Airports set to reopen)
सोमवारी एका निवेदनात, सरकारी मालकीच्या एएआयने म्हटले आहे की, १५ मे रोजी सकाळी ५:२९ पर्यंत नागरी विमानांच्या उड्डाणांसाठी बंद असलेली ३२ विमानतळे आता तात्काळ उड्डाणांसाठी सुरू केले आहेत.
‘‘प्रवाशांनी थेट एअरलाइन्सशी संपर्क साधून विमानाची स्थिती जाणून घ्यावी. तसेच नियमित अपडेटसाठी एअरलाइन्सच्या वेबसाइटला भेट द्यावी, ’’ असे आवाहन या निवेदनात केले आहे.
श्रीनगर आणि अमृतसरसह उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळांवरील नागरी उड्डाणे ९ मे ते १५ मे पर्यंत स्थगित करण्यात आली होती. (Airports set to reopen) भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) इतर विमान वाहतूक अधिकाऱ्यांसह, एअरमेनना नोटीस जारी केली होती. यामध्ये उत्तर आणि पश्चिम भारतातील ३२ विमानतळ सर्व नागरी उड्डाणांसाठी तात्पुरते बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती.
हेही वाचा :
शस्त्रसंधीनंतर शेअर बाजारात दणदणीत तेजी
ट्रम्प मध्यस्थीचा प्रस्ताव काँग्रेसने फेटाळला