फिफा वर्ल्ड कपचा फिव्हर जोरात चढला आहे. आपल्या संघाला समर्थन करण्यासाठी शेकडो मैलाचा प्रवास करुन समर्थक येत आहेत. अनेक समर्थक चित्र विचित्र पोषाख करुन येतात. संघांचे टी शर्ट, मफलर, टोप्या घालून येतात. ड्रम वाजवतात, शिट्ट्या वाजवतात. ‘मेक्सिकन वेव्हज्’ तर मैदानावर गोलाकार फिरतात. पण सर्वात जास्त चर्चा आहे ती यंदाच्या वर्ल्ड कपमधील अफ्रिकन संघ डीआर काँगो देशाच्या एका समर्थकाची. पिवळा कोट,टाय घातलेला हा समर्थक सामना सुरू झाल्यावर हात वरुन करुन सामना संपेपर्यंत एका जागेवर उभा राहतो. मिशेल कुका म्बोलाडिंगा असे त्यांचे नाव आहे. ‘मी एका पुतळ्यासारखा उभा आहे’ असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. जगभरातील सर्वच सोशल मिडियावर त्यांची चर्चा आहे. त्यांचा फॅनफालोअर्सही मोठा आहे. फुटबॉलचे सामना पाहणाऱ्या तरुण समर्थकांच्या तोंडात मिशेल कुकाचे नाव तोंडात आहे. (DR Congo supporter Lumumba Weah)
सतीश घाटगे
फिफा वर्ल्डकपचे आयोजन अमेरिका, कॅनडा, मेक्सिको या देशांनी केले आहे. पण अमेरिका वगळता मेक्सिको आणि कॅनडामध्ये झालेल्या डीआर काँगोंच्या सामन्यांना मिशेल कुका मब्लोलाडिंगा उपस्थित होते. मध्य अफ्रिकेतील देशात इबोलाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अमेरिकेने घातलेल्या निर्बंधामुळे त्यांचा व्हिसा मंजूर झाला नाही. त्यामुळे डीआर काँगोने जेव्हा उझबेकीस्तानला ३-१ असे हरवन पहिल्यांदा फिफा वर्ल्डकपच्या इतिहासात बाद फेरीत स्थान मिळवून इतिहास रचला तेव्हा लुमुम्बा वेआ च्या वेशातील म्लोलाडिंगा प्रेक्षक गॅलरीत उपस्थित नव्हते.
कोण आहेत लुमुम्बा
डीआर काँगो देशात लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पहिले पंतप्रधान पॅट्रिस एमरी लुमुम्बा होते. त्यांच्याशी विलक्षण साम्य असल्याने मिशेल कुका म्बोलाडिंगा २०१३ पासून काँगो देशाच्या प्रत्येक सामन्यात लुम्ब्बा वेआ यांची भूमिका साकारत आहेत. बेल्जियन वसाहतीच्या राजवटीविरुद्ध झालेल्या संघर्षात लुमुम्बा काँगोच्या राष्ट्रवादाचे प्रतिक होते. ते फक्त तीन महिने सत्तेवर असूनही त्यांच्या मृत्यूनंतर ६५ वर्षाहून अधिक काळानंतर त्यांचे स्मरण ठेवले जाते. १९६१ मध्ये लष्करी उठावानंतर वयाच्या ३५ वर्षी लुमुम्बाची हत्या करण्यात आली होती.
अफ्रिकन नेशनच्या अंतिम सामन्यात प्रसिद्धीच्या झोतात
लुमुम्बा वेआ मोरोक्कोमध्ये झालेल्या २०२५ च्या अफ्रिका कप ऑफ नेशन्सच्या अंतिम सामन्यात प्रसिद्धीच्या झोतात आले. ज्यावेळी डीआर काँगोचा सामना असेल ते एका उंच चौथऱ्यावर पुतळ्यासारखे उभे राहण्याच्या त्यांच्या पद्धतीची फुटबॉल जगताने दखल घेतली. त्यांची संघाच्या अधिकृत तुकडीत समाविष्ट करण्यासाठी काँगोचे अध्यक्ष फेलिक्स त्शिकेदी यांच्याकडे केली आहे. (DR Congo supporter Lumumba Weah)
फिफा वर्ल्डकपमध्ये टेक्सासमधील पोर्तुगालमध्ये काँगोचा पहिला सामना त्यांचा चुकला. पण त्यानंतर मेक्सिकोच्या ग्वादालहारा येथे कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात लुमुम्बा प्रेक्षक गॅलरीत उपस्थित होते. आपल्या भूमीवर धुमसत असलेल्या गृहयुद्धावर पाश्चिमात्य देशांनी साधलेल्या मौनाच्या निषेधार्थ एक हात तोंडावर आणि दुसऱा डोक्याला बंदुकीसारखा लावला होता. तेव्हा कॅमेऱ्याने दुसरीकडे लक्ष वळवले.
वॉशिग्टंनमध्ये काँगोचा बलाढ्य इंग्लंडविरुद्ध सामना आहे. अजुन त्यांना अमेरिकेने व्हिसा दिलेला नाही. पण अमेरिकेतील काँगोचे राजदूत कपिंगा इव्हेंट न्गांडू यांना त्या सामन्यात खास शैलीत संघाला पाठिंबा देतील अशी आशा व्यक्त केली आहे. (DR Congo supporter Lumumba Weah)