नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्य कांत यांनी बेरोजगार तरुण झुरळासारखे असतात या टीपणीनंतर सोशल मिडियावर नव्याने स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीने धुमाकुळ घातला आहे. ‘इन्स्टाग्राम’वर या अराजकीय पक्षाचे तब्बल पाच मिलियन्सहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. पार्टीच्या पेजला १० ते २० हजारहून अधिक लोकांनी भेट दिली आहे. (‘Cockroach Janata Party’ creates a sensation on social media)
सर्वोच्च न्यायालयात १५ मे रोजी झालेल्या एका वकिलाच्या जेष्ठता पदनामाच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुनावणीच्यावेळी अपिल करणाऱ्या वकिलावर चिडून सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्य कांत म्हणाले होते. ‘आधीच समाजात काही परजीवी प्रवृती सक्रीय आहेत. ज्या व्यवस्थेवर हल्ला करतात. तुम्हाला त्यांच्याशी हात मिळावायचा आहे का? काही बेरोजगार तरुण झुरळासारखे असतात. ज्यांना रोजगार मिळत नाही आणि व्यवसायात स्थान नसते ते पुढे जाऊन मिडिया, सोशल मिडिया आणि आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि सर्वांवर टीका करण्यास सुरूवात करतात. त्यांच्या विधानावर चौफेर टीका सुरू झाल्यावर न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला असून तो खोट्या, बनावट पदव्या घेऊन गंभीर आणि प्रतिष्ठीत व्यवसायात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीवर होता. भारतीय तरुण देशाचे मुख्य आधारस्तंभ आहेत, देशातील तरुण त्यांना नेहमी प्रेरणा देतात, असा खुलासाही त्यांनी केली होता. (‘Cockroach Janata Party’ creates a sensation on social media)
न्यायालयाच्या टीकेनंतर छत्रपती संभाजीनगरमधील अभिजीत दिपके या तरुणाला कॉक्रोच जनता पार्टी उभी करण्याची संकल्पना सूचली. त्याने सोशल मिडियावर पेज बनवले. त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. अभिजीत दीपकेने पत्रकारितेची पदवी घेतली आहे. त्यानंतर तो उच्च शिक्षणासाठी अमेरिकेलाही गेलो होता. बोस्टन विद्यापीठातून जनसंपर्क या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी घेतली. २०२० ते २०२२ या काळात तो आम आदमी पक्षाच्या सोशल मिडियात काम करत होता. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीतील आपच्या मीम्समागे अभिजीत दीपके याने केले होते अशी चर्चा आहे. आता त्याने सोशल मिडियावर कॉक्रोच जनता पार्टी उभी करुन धुमाकुळ माजवला आहे. (‘Cockroach Janata Party’ creates a sensation on social media)