नवी दिल्ली : परदेशातील एका वॉन्टेड गुंडाने कोट्यवधीची खंडणी मागण्यासाठी पाठवलेल्या मारेकऱ्यांच्या टोळीला पोलिसांनी नेस्तानाबूत केले. पोलिसांच्या एनकाऊंटरमध्ये चार गुंड जागीच ठार झाले. पाचवा गुंड जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी झालेल्या चकमकीत अवघ्या तीन मिनिटात दोन्हीकडून बंदुकीच्या १२० फैरी झाडल्या गेल्या. तीन पोलिसही जखमी झाले आहेत. हरियाणातील गुडगावच्या उच्चभ्रू बेव्हरली पार्क वन आणि एसेल टॉवरच्या मध्ये वसलेल्या संशांत लेक कॉलनीत ही चकमक घडली. (Encounter between police and gangsters in Gurgaon)
या चकमकीत अकरावीच्या एका विद्यार्थ्यासह चार हल्लेखोर ठार झाले. दीपा उर्फ संदीप (वय ३५, रा. फतेहाबाद), नितीन (२२), अंकित (१८) आणि १७ वर्षीय भालाफेक करणारा खेळाडू अशी ठार झालेल्यांची ओळख पटली आहे.
हल्लेखोर स्कॉर्पिओ एसयूव्हीमधून आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी या परिसराला वेढा घातला. पोलिसांनी गुंडांना आत्मसमर्पण करण्याच्या सुचना दिल्या पण हल्लेखोरांकडून पोलिसांवर गोळीबार केल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौघे ठार झाले. गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही चकमक घडली.
नंदाल टोळीच्या गुंडाकडून बंगल्यावर गोळीबार
यूकेस्थित गुंड दीपक नंदालने एका खासगी विद्यापीठाच्या सह संस्थापकाचा मुलगा विशाल बेरी १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यावेळी तो व्यावसायिक एका पबमध्ये होता. स्कॉर्पिओमधून आलेल्या गुंडांनी व्यापारी बेरी याच्या बंगल्याच्या रॅम्पवर कार पार्क केली. त्यांनी बंगल्याच्या आवारात असलेल्या गाड्यावर आणि पहिल्या मजल्यावरील बाल्कनी आणि खिडक्यावर गोळीबार केला. त्यावेळी बंगल्यात बेरी यांची पत्नी, त्याचा भाऊ आणि मेहुणा उपस्थित होते. गोळीबार करत असताना एकजण चित्रिकरण करत होता तर दुसरा कार चालवत होता. (Encounter between police and gangsters in Gurgaon)
गुंडाकडून ऑटोमॅटिक पिस्तूलमधून ४० फायर
दरम्यान उद्योगपती बेरी यांना पूर्वीच आलेल्या धमक्याच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची तीन पथके तैनात करण्यात आली होती. एका पथकाने गल्लीची एक बाजू अडवून गोळीबार करणाऱ्या आत्मसमर्पण करण्यास सांगितले. पण घाबरलेल्या गुंडांनी पळून जाण्यासाठी पोलिसांवर गोळीबार केली. पोलिस आणि गुंडामध्ये दोन मिनिट चकमक चालली. त्यामध्ये गुंडाकडे असलेल्या ऑटोमॅटिक पीएक्स ३० पिस्तूलमधून ४० गोळ्यांच्या फैरी झाडल्या गेल्या. पण प्रत्युत्तरादाखल केलेल्या पोलिसांच्या गोळीबारात चौघांचा जागीच मृत्यू झाला. या कारवाईत ३० पोलिस सहभागी झाले होते. चकमक सुरू होण्यापूर्वी या परिसरात नागरिक फिरायला बाहेर पडले होते. पण चकमक सुरू झाल्यावर घाबरलेल्या नागरिकांनी कार आणि झांडांच्या मागे आश्रय घेतला.
तीन पोलीस कर्मचारी जखमी
दीपक उर्फ संदीप, नितीन, अंकीत आणि एक १७ वर्षाचा मुलगा ठार झाला. दीपाच्या छाती,मान आणि डाव्या पायाला चार गोळ्या लागल्या. अंकितच्या पोटात, मानेत आणि पायांना सात गोळा लागल्या. नितीनच्या छातीत आणि पोटात पाच गोळ्या लागल्या. तर अल्पवयीन मुलाच्या डोक्यात आणि छातीत पाच गोळ्या लागल्या. कॉन्स्टेबल मनजीत सिंग, शरशेरसिंग आणि सहाय्यक उप निरीक्षक सुनील कुमार यांना गोळी लागल्याते ते जखमी झाले. त्यांच्यावर मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
कारवाईचे नेतृत्व करणाऱ्या डीसीपी हितेश यादव यांनी टीओयला सांगितले की. नंदालने या व्यावसियकाला अनेक वेळा धमक्या दिल्या होत्या. नकार मिळाल्याने त्याने मारेकऱ्यांना पाठवले होते. गोळीबार, खंडणी, खुनाच्या अनेक प्रकरणात नंदाल पोलिसांना हवा आहे. (Encounter between police and gangsters in Gurgaon)