सातारा; प्रतिनिधी : सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करत संपर्क वाढवून ग्राहकांसाठी देहविक्री व्यवसाय करणार्या सातार्यातील कथित रिलस्टार आणि तिच्या तीन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. संशयितांनी आणलेल्या पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. त्या रिलस्टारसह पोलिसांनी गणेश मनोहर भोसले (रा.चौथाई गल्ली, कोरेगाव), ईश्वर सुभाष जाधव (रा.विलासपूर, सातारा), वीरेंद्र महेंद्र जाधव (रा.सदर बझार, सातारा) यांना ताब्यात घेतले आहेत. (Satara Crime)
सातारा तालुक्यातील एका गावात राहणारी कथित रिलस्टार सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी संपर्क वाढवून त्यांना मुली पुरवत असल्याची चर्चा गेली अनेक दिवस सुरू होती. दरम्यान याच संशयितांचा एक कॉल रेकॉर्ड समाजमाध्यमात प्रसारित झाल्याने पोलीस त्यांच्या मागावर होते. त्यानुसार सातारा पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने खिंडवाडी (ता. सातारा) गावच्या हद्दीत सापळा लावला होता. त्यानुसार कथित अभिनेत्री आणि तिच्या साथीदारांनी काही मुली देहविक्रयासाठी आणल्याचे समजले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक श्वेता पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमले होते. त्या पथकाने एका हॉटेलवर संशयितांना बोलवून घेत त्यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर पीडित दोन मुलींची सुटका करून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Satara Crime)
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक वैशाली कडुकर, पोलीस निरीक्षक अरूण देवकर, निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, मोरडे, पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, सहाय्यक फौजदार रामचंद्र गुरव, हवालदार मोना निकम, पंकजा जाधव, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, क्रांती निकम यांनी केली.
हेही वाचा :