मुंबई : विशेष प्रतिनिधी : २६/११ दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी २००९ पासून कायदेशीर प्रक्रिया सुरु होती. आता त्याचे श्रेय घेतले जाईल. मग त्याला बिहार निवडणुकी दरम्यान फाशीची शिक्षा दिली जाईल. निवडणुकांसाठी भाजप काहीही करु शकते, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) केला. (Raut’s attack on BJP)
भाजपामध्ये धमक असेल तर कुलभूषण जाधव आणि देशाची लूट करून परदेशात पळून गेलेल्या विजय मल्ल्या, मेहुल चोक्सीला घेऊन यावे, असे आव्हानही राऊत यांनी दिले. (Raut’s attack on BJP)
राणाला भारतात आणणे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटनीतीचे यश आहे, असे मत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले होते. त्याला राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, राणाला भारतात आणण्यासाठी २००९ पासून कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. आता त्याचे श्रेय घेतले जाईल. मग त्याला बिहार, प.बंगालच्या निवडणुकीच्या दरम्यान फाशीची शिक्षा दिली जाईल. निवडणुकांसाठी भाजप काही करु शकतो.
राणाचे प्रत्यार्पण झाल्यानंतर देशातील आर्थिक घोटाळ्यांमध्ये आरोपी असलेले नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यापैकी एकाला भारतात आणून मोठा विजय साजरा करावा, राणाला भारतात आणण्याचे श्रेय तत्कालीन सरकारचे आहे. त्याकाळात ही प्रक्रिया सुरु झाली होती, असा दावा त्यांनी सांगितले. (Raut’s attack on BJP)
अमित शहा तटकरेंचे नेते
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३४५ व्या पुण्यतिथी निमित्त शहा शनिवारी, १२ एप्रिल रोजी किल्ले रायगडवर येत आहेत. त्यानिमित्त ते खासदार सुनील तटकरे यांच्या गीताबाग येथील निवासस्थानी स्नेहभोजन करणार आहेत. त्यावरुन राऊत यांनी तटकरे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, ‘तटकरे यांचे नेते अजित पवार नाहीत. त्यांचे नेते अमित शाह आहेत. एकनाथ शिंदे यांचे नेते अमित शहा आहेत. शहा नसते तर हा पक्षच फुटला नसता. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिली नाही. देवेंद्र फडणवीस यांना आपण गृहमंत्री असल्याचे माहीत नाही. रोज नागपूर, मुंबई आणि राज्यात महिलांवर अत्याचार होत आहे. त्यानंतर गृहमंत्री कुठे दिसत नाही.’
हेही वाचा :
वाघ्याचं काय घेऊन बसलाय, द्या दणका!
कुरूंदकरला २१ एप्रिलला शिक्षा सुनावणार