मेलबर्न : पोलंडच्या द्वितीय मानांकित इगा स्वियातेकने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. चौथ्या मानांकित इटलीच्या जॅस्मिन पाओलिनीला मात्र तिसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीत अग्रमानांकित यानिक सिनरने चौथी फेरी गाठली, तर चतुर्थ मानांकित टेलर फ्रिट्झचे आव्हान तिसऱ्या फेरीत संपुष्टात आले.(Grand Slam)
स्वियातेकने तिसऱ्या फेरीत ब्रिटनच्या एमा रॅडुकॅनूला ६-१, ६-० असे सहज हरवले. हा सामना स्वियातेकने अवघ्या १ तास १० मिनिटांत जिंकला. चौथ्या फेरीत स्वियातेकचा सामना जर्मनीच्या इव्हा लिसशी होईल. युक्रेनच्या २८ व्या मानांकित एलिना स्विटोलिनाने इटलीच्या पाओलिनीला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २-६, ६-४, ६-० असे पराभूत केले. चौथ्या फेरीत ती व्हेरॉनिका कुडेरमेटोवाविरुद्ध खेळेल.(Grand Slam)
पुरुष एकेरीत इटलीच्या गतविजेत्या सिनरने तिसऱ्या फेरीमध्ये अमेरिकेच्या मार्कोस गिरॉनला ६-३, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. सिनरने २ तास १ मिनिटांत हा विजय निश्चित केला. फ्रान्सच्या गेल माँफिलिसने ३ तास ८ मिनिटे रंगलेल्या लढतीत अमेरिकेच्या फ्रिट्झवर ३-६, ७-५, ७-६(७-१), ६-४ अशी मात केली. चौथ्या फेरीत माँफिलिसचा सामना अमेरिकेच्याच २१ व्या मानांकित बेन शेल्टनशी होईल.(Grand Slam)
पुरुष दुहेरीमध्ये भारताचा एन. बालाजी पराभूत
भारताचा एन. श्रीराम बालाजी आणि त्याचा मॅक्सिकन साथीदार मिग्युएल रायेस-वारेला यांना पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. पोर्तुगालच्या ननो बॉर्जेस-फ्रान्सिस्को कॅब्रल या जोडीने बालाजी-वारेला यांना २ तास ९ मिनिटांमध्ये ७-६(७-१), ६-४, ६-३ असे पराभूत केले. बालाजीच्या पराभवामुळे पुरुष दुहेरीतील भारतीय टेनिसपटूंचे आव्हान संपुष्टात आले आहे. भारताचे अन्य टेनिसपटू पहिल्या फेरीतच पराभूत झाले होते.(Grand Slam)
We are all spelling speed incorrectly; it should be spelt 𝑺𝒘𝒊𝒂𝒕𝒆𝒌
Iga advances into the fourth round, defeating Raducanu 6-1 6-0. @wwos • @espn • @eurosport • @wowowtennis • @iga_swiatek • #AusOpen • #AO2025 pic.twitter.com/KAEj62CGrE
— #AusOpen (@AustralianOpen) January 18, 2025
हेही वाचा :
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर