Home » Blog » suspect detained : सैफवरील हल्लेखोरासारखा दिसणारा तरुण छत्तीसगडमध्ये ताब्यात

suspect detained : सैफवरील हल्लेखोरासारखा दिसणारा तरुण छत्तीसगडमध्ये ताब्यात

दादरमध्ये एका दुकानातून खरेदी केले मोबाईल फोनचे कव्हर

by प्रतिनिधी
0 comments
suspect detained

मुंबई : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याप्रकरणी  एका  संशयिताला रेल्वे संरक्षण दलाने (आरपीएफ) छत्तीसगडमधील दुर्ग रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. ३१ वर्षीय संशयिताला दुर्ग आरपीएफ कार्यालयात ताब्यात घेण्यात आले असून मुंबई पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी लवकरच येणार आहेत.(suspect detained)

शालीमार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसच्या जनरल डब्‍यातून रेल्‍वे पाेलिसांनी आकाश कुनरीया नावाच्या ३१ वर्षीय संशयित तरूणाला मुंबई पोलिसांनी पाठवलेल्या माहितीच्या आधारे पकडले आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. रविवारी ते मुंबईला परततील, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान संशयित म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आले असून चौकशीनंतर त्याबाबत स्पष्टता येईल, असे मुंबई पोलीस दलातील विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सांगितले.(suspect detained)

दरम्यान,  हल्लेखोराने नंतर दादरमधील एका दुकानातून जाऊन मोबाईल फोनचे कव्हर खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांना हा धागा सापडला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस पथकाने हल्लेखोराच्या हालचाली तपासल्या. त्यावरून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे. (suspect detained)

पोलिस विभागातील सूत्रांनी सांगितले की, वांद्रे येथील लकी जंक्शन परिसरात दिसल्यानंतर, आरोपी लोकल ट्रेनमध्ये चढला, तेथून तो दादरला गेला. दादर (पश्चिम) रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म १ जवळील इक्रा नावाच्या दुकानातून त्याने मोबाईल फोनचे कव्हर खरेदी केले. सुविधा शोरूमच्या बाहेर येऊन तो कबुतरखान्याच्या दिशेने गेला, असे सीसीटीव्ही रेकॉर्डवरून स्पष्ट होत आहे. (suspect detained)

सकाळी ९.०४ च्या सुमारास तो मोबाईल शॉपमध्ये होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आरोपीच्या हालचाली रेकॉर्ड झाल्या आहेत. ज्या व्यक्तीने आरोपीला फोनचे कव्हर विकले त्याचा जबाब पोलिस नोंदवू शकतात. (suspect detained)

खानवर हल्ला झाल्यानंतर तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर लिलावती हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सैफची पत्नी करीना, केअरटेकर महिलांचे जबाब नोंदवले आहे. पोलिस या घटनेचा सर्व शक्यता गृहित धरून तपास करीत आहेत. जवळपास २४ पोलिसांचे पथक या घटनेचा तपास करीत आहे. (suspect detained)

हेही वाचा :
‘त्यांना’ का सोडता?

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00