Home » Blog » Rahul Gandhi : राहुल गांधींना दिलासा

Rahul Gandhi : राहुल गांधींना दिलासा

मानहानी खटल्याला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

by प्रतिनिधी
0 comments
Rahul Gandhi

नवी दिल्ली : निवडणूक प्रचारादरम्यान अमित शहा यांच्याबद्दल कथित अवमानकारक टिपणी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्धच्या मानहानीच्या खटल्याला सुप्रिम कोर्टाने सोमवारी तात्पुरती स्थगिती दिली. काँग्रेसच्या कार्यक्रमात अमित शहा यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते. या वक्तव्याबद्दल भाजपचे पदाधिकारी नवीन झा यांनी खटला दाखल केला होता.  (Rahul Gandhi)

गांधी यांनी ‘एक खुनी भारतीय जनता पक्षामध्ये पक्षाध्यक्ष होऊ शकतो, परंतु काँग्रेसमध्ये ते शक्य नाही,’ असे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी भाजपविरोधात अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप झा यांनी केला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी चाईबासा येथे गांधी यांनी शहा यांच्याबद्दल कथित अवमानकारक टिपणी केली होती. झा यांची याचिका मॅजिस्ट्रेटने फेटाळली. पण न्यायिक आयुक्तांनी त्यांचा निर्णय उलटवला. दंडाधिकाऱ्यांनी पुराव्यांचा पुन्हा विचार करण्यास प्रवृत्त केले. भारतीय दंड संहितेच्या कलम ५०० अंतर्गत खटला दाखल करण्यासाठी पुरेशी कारणे आहेत, असा निर्णय दिला होता.(Rahul Gandhi)

त्यानंतर गांधींनी झारखंड उच्च न्यायालयात हजर राहण्यास सूट मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांनी फौजदारी कारवाईला स्थगिती दिली आणि झारखंड सरकार आणि याचिकाकर्ते झा यांना नोटीस बजावली.(Rahul Gandhi)

सर्वोच्च न्यायालयात गांधी यांची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी, हा खटला तृतीय पक्षाने दाखल केल आहे. केवळ थेट पीडितच अशी तक्रार दाखल करू शकतात, असे सांगत या तक्रारीच्या वैधतेवरच सिंघवी यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले.

हेही वाचा :

राहुल गांधींची ‘व्हाईट टी शर्ट मुव्हमेंट’

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00