Home » Blog » Sunsex jumps over  : शेअर बाजारात उसळी

Sunsex jumps over  : शेअर बाजारात उसळी

सेन्सेक्स १५०० अंकांनी वाढला

by प्रतिनिधी
0 comments
Sunsex jumps over

नवी दिल्ली: प्रतिनिधी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून अनेक देशांवर लागू केलेले टॅरिफ तीन महिने स्थगित केल्याची घोषणा केल्याने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शुक्रवारी भारतीय शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स १५०० अंकांनी वाढून ७५,३८४.७६ वर पोहोचला. तर निफ्टी ५० ५०० अंकांनी वाढून २२,९०० वर पोहोचला. (Sunsex jumps over)

आज शुक्रवारी सकाळी सुरुवातीच्या व्यवहारात दोन्ही निर्देशांक १.३% पेक्षा जास्त वधारले. जागतिक शेअर बाजारातील तेजीमुळे ही वाढ झाली आहे. सुरुवातीच्या सत्रात बँकिंग, ऑटो आणि आयटी कंपन्याचे शेअर्समध्ये वाढती कमान दिसून आली. . सोमवारी शेअर बाजार कोळल्यानंतरही मंगळवारी बाजारांनीही जोरदार सुधारणा केली. सेन्सेक्स १,०८९ अंकांनी वाढून ७४,२२७.०८ वर बंद झाला आणि निफ्टी ५० ३७४ अंकांनी वाढून २२,५३५.८५ वर बंद झाला, ज्यामध्ये अनुक्रमे १.४९ टक्के आणि १.६९ टक्के वाढ झाली. (Sunsex jumps over)

दरम्यान, निफ्टीचा कंझ्युमर ड्युरेबल्स इंडेक्स तीन टक्क्यांनी  वाढला आणि मेटल, रिअल्टी आणि फायनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स दोन टक्केपेक्षा जास्त वाढले. या तेजीत व्यापक बाजारांनीही भाग घेतला, निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉलकॅप १०० प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. (Sunsex jumps over)

हेही वाचा :
पेट्रोल चोराकडून १४ घरफोड्या उघडकीस

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00