Home » Blog » Nandiwale : पोलिसांच्या ताब्यातून ‘पोक्सो’ तील आरोपी पळाला

Nandiwale : पोलिसांच्या ताब्यातून ‘पोक्सो’ तील आरोपी पळाला

पाच दिवस शोध घेऊन आरोपी गायब

by प्रतिनिधी
0 comments
Nandiwale

कोल्हापूर : प्रतिनिधी : पोक्सो गुन्ह्यात ताब्यात घेतलेला संशयित पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला हिसडा मारुन पळून गेला. पाच दिवसापूर्वी ही घटना घडली होती. अखेर संशयित पळून गेला अशी फिर्याद पोलिसांनाच देण्याची वेळ आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पाच दिवस यंत्रणा लागूनही अद्याप संशयित मिळून आलेला नाही. (Nandiwale)

करवीर पोलिस ठाण्यात रोहित उर्फ गुंडाजी नंदीवाले (वय २२ रा. कोथळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) याला पोक्सो कायदयाअंतर्गत पोलिसांनी १५ मे रोजी एका गुन्ह्यात ताब्यात घेतले. अटक करण्यापूर्वी संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलिस त्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याच्यासोबत एक दिव्यांग संशयित होता. तीन पोलिस दोन संशयितांना घेऊन पोलिस वाहनाने सीपीआर हॉस्पिटलमध्ये आले. दिव्यांग संशयिताला चालता येत नसल्याने दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला खांद्यावरुन उचलून कुंभी बिल्डिंगमध्ये नेले. त्यावेळी संशयित रोहित नंदीवाले सोबत एक पोलिस होता. रोहितने लघूशंकेला जायचे आहे असे त्याच्यासोबत असलेल्या पोलिसाला सांगितले. त्यानंतर त्याला लघूशंकेसाठी घेऊन जात असताना रोहितने पोलिसाच्या हाताला हिसडा मारुन सीपीआर हॉस्पिटलच्या आवारातून पळ काढला. पोलिसांना त्याचा पाठलाग केला पण फाटकावरुन उडी मारुन रोहित नंदीवाले पळून गेला. (Nandiwale)

गेले पाच दिवस पोलिस रोहितचा शोध घेत आहेत पण तो मिळून आला नाही. अखेर पोलिसांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात रोहित पळून गेला अशी तक्रार दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आला. (Nandiwale)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00