महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करत आहे. आजपासून सुरू झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचा पहिला सामना कर्नाटकविरूद्ध झाला. या सामन्यात श्रेयस अय्यरने दमदार कामगिरी करत नाबाद ११४ धावा केल्या आणि चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा दावा केला. (Shreyas Iyer)
आजपासून सुरू झालेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटक विरूद्धच्या सामन्यात श्रेयस अय्यरने दमदार फलंदाजी करत शतक झळकवले. परंतु, या सामन्यात कर्नाटकने सामन्यात मुंबईवर ७ विकेट राखून विजय मिळवला.
श्रेयस अय्यर गेल्या काही काळापासून टीम इंडियापासून बाहेर आहे. परंतु, देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. आज झालेल्या कर्नाटक विरूद्ध सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रेयस अय्यरने ५५ चेंडूत ५ चौकार आणि १० षटकारांच्या सहाय्याने शतकी खेळी केली.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी
याआधी श्रेयस रणजी ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही खेळताना दिसला होता. रणजीमध्ये मुंबईकडून खेळताना त्याने चार सामन्यांमध्ये ४५२ धावा केल्या.तर, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये ३४५ धावा केल्या. नऊ सामन्यांमध्ये त्याचा स्ट्राइक रेट १८८.५२ होता. (Shreyas Iyer)
पुनरागमनावर मजबूत दावा
श्रेयसने विजय हजारे ट्रॉफीत शतकी खेळी करत टीम इंडियात पुनरामन करण्याचा दावा केला आहे. २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होणार आहे. (Shreyas Iyer)
The format changed, but Shreyas Iyer’s brilliance stayed consistent! 🔥#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI | @ShreyasIyer15 pic.twitter.com/TOOTSnMDQ2
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) December 21, 2024
हेही वाचा :
- बीड जिल्ह्यात पीकविम्यात हजारो कोटींचा घोटाळा
- संतोष अजमेरा यांना आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार
- रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट