Home » Blog » वर्षानुवर्षे फसवणाऱ्यांना जागा दाखवा

वर्षानुवर्षे फसवणाऱ्यांना जागा दाखवा

संजयकाका पाटील यांचे सावळजकरांना आवाहन

by प्रतिनिधी
0 comments
Sanjay Kaka Patil

तासगांव; प्रतिनिधी : मी काम करणारा माणूस आहे. दुसऱ्याची रेष पुसण्यापेक्षा, माझी रेघ मोठी करून लोकांची कामे करण्यात मला रस आहे. दुसऱ्या बाजूला सातत्याने ४० वर्षे जो सावळज भाग ताकदीने पाठीमागे राहिला त्यांची फसवणूक करणारे, आजपर्यंत हक्काचे पाणी न देऊ शकणारे, लोक आहेत. सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करा. आपला जन्म कोणाला तरी आमदार आणि खासदार करण्यासाठी नाही. तर आपला प्रपंच मोठा करण्यासाठी झाला आहे. त्यामुळे सावळज भागातील लोकांनी विचारपूर्वक योग्य निर्णय घेऊन मतदान करावे,  असे आवाहन संजय काका पाटील यांनी केले.

सावळज आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले ‘विसापूर पुणदी योजनेचे शेपूट सिद्धेवाडी तलावात सोडून हा तलाव तीन वेळा भरून देण्याचे वचन तत्कालीन मंत्र्याने दिले होते. मात्र प्रत्यक्षात २०१४ साली ३ हजार हेक्टर पैकी फक्त ४६४ हेक्टर क्षेत्राला पाणी मिळाले. विसापूर योजनेचे दोन पंप कधीच चालू झाले नाहीत. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईगडबडीने योजना करण्यात आली.’

एमआयडीसी आणली म्हणून  तासगावत जेसीबीने गुलाल उधळून घेतला. यापूर्वी फाईव्ह स्टार एमआयडीसीच्या घोषणा झाल्या होत्या. या एमआयडीसीमध्ये ५० एकरात एक मध्यम प्रकल्पही उभा राहू शकत नाही. ५० एकराच्या एमआयडीसीची जाहिरात करायला ५५ लाख रुपये खर्च केले असा टोला पाटील यांनी रोहित पाटील यांना लगावला. १२०५ कोटी रुपये टेंभू योजनेसाठी मी आणले. सावळज पूर्व भागातील गावे आधीच यात समाविष्ट असताना तालुक्याचे भावी नेते उपोषणास बसले. सिद्धेवाडी तलावातील डावा आणि उजवा कालवासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर झाला आहे,  गोरेवाडी कालव्यातून तीन वर्षापासून सिद्धेवाडी तलाव भरला जातो आहे. पुढील काळात या भागाचा पाणी प्रश्न सोडवायला कटिबद्ध आहे, अशी ग्वाहीही पाटील यांनी यावेळी दिली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00